scorecardresearch

Womens IPL : क्रिकेटच्या मैदानातही गौतम अदाणींची सरशी, मुकेश अंबानींच्या मुंबईपेक्षा महागडा संघ केला खरेदी

उद्योगपती गौतम अदाणी आता आयपीएलच्या मैदानात उतरले आहेत. अदाणी यांनी आज एका महिला आयपीएल संघाची खरेदी केली आहे.

Womens IPL : क्रिकेटच्या मैदानातही गौतम अदाणींची सरशी, मुकेश अंबानींच्या मुंबईपेक्षा महागडा संघ केला खरेदी
उद्योगपती गौतम अदाणी आता आयपीएलच्या मैदानात उतरले आहेत. अदाणी यांनी आज एका महिला आयपीएल संघाची खरेदी केली आहे.

Womens IPL Bidders : इंडियन प्रीमियर लीग ही जगातली सर्वात मोठी टी-२० क्रिकेट स्पर्धा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडून या लीगचं आयोजन केलं जातं. आता बीसीसीआय महिलांची आयपीएल स्पर्धा खेळवणार आहे. महिला आयपीएल २०२३ या स्पर्धेसाठीच्या संघांचा लिलाव पूर्ण झाला आहे. तसेच महिला आयपीएल संघांची नावं देखील समोर आली आहे. सर्वांचं लक्ष महिला आयपीएलमधील अहमदाबाद संघाकडे होतं. जगातले तिसरे आणि भारतातले सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदाणी यांनी अहमदाबादचा संघ खरेदी केला आहे. विशेष म्हणजे हा भारतातला सर्वात महागडा संघ ठरला आहे.

महिला आयपीएलचे प्रक्षेपण अधिकार नुकतेच विकले गेले आहेत. गेल्या आठवड्यात माध्यम अधिकारांचा लिलाव करण्यात आला. त्यानंतर आज महिला संघांचा लिलाव करण्यात आला. महिला आयपीएलच्या यंदाच्या पहिल्या पर्वात एकूण ५ संघ सहभागी होतील. ज्यामध्ये मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, लखनौ आणि दिल्लीचा समावेश आहे. सर्वच संघांसाठी शेकडो कोटी रुपयांची बोली लागली. यामध्ये अहमदाबादचा संघ सर्वात महागडा ठरला तर लखनौच्या संघासाठी कॅप्री ग्लोबल होल्डिंग्स कंपनीने सर्वात कमी ७५७ कोटी रुपये मोजले.

अहमदाबादच्या संघासाठी अदाणींनी मोजले सर्वाधिक १२८९ कोटी रुपये

बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबादचा महिला आयपीएल संघ अदाणी स्पोर्ट्सलाईन ग्रुपने १२८९ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला आहे. तर बंगळुरूचा संघ रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने ९०१ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला आहे. मुंबईचा संघ खरेदी करण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने ९१२.९९ कोटी रुपयांची सर्वात मोठी बोली लावली. दिल्लीचा संघ जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ८१० कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केला आहे. तर लखनौ संघासाठी कॅप्री ग्लोबल होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडने ७५७ कोटी रुपये मोजले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 16:35 IST

संबंधित बातम्या