Video : IPL 2020 ची UAE वारी, या तीन मैदानांवर रंगणार सामने

१९ सप्टेंबरपासून स्पर्धेला होणार सुरुवात

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघ युएईत दाखल झाले आहेत. यंदा भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता युएईत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. करोनाविषयीचे सर्व नियम पाळण्यासाठी सर्व संघांनी आपल्या खेळाडूंना राहण्यासाठी खास पंचतारांकित हॉटेल्सची सोय केली आहे.

भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदाचा आयपीएल हंगाम युएईत आयोजित करण्यात आला आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा खेळवली जाईल. एक-एक करुन सर्व संघ युएईत दाखल झाले असून आता परदेशी खेळाडूही हळुहळु आयपीएल खेळण्यासाठी युएईत येत आहेत. सध्या संपूर्ण जग करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढतं आहे. अशा परिस्थितीत आयपीएलसाठीही बीसीसीआय आणि सर्व संघमालकांनी खास उपाययोजना आखल्या आहेत. युएईमधील ३ मैदानांवर हे सामने खेळवले जातील. यंदाची स्पर्धा भारतात होणार नसल्यामुळे युएईमधील खेळपट्ट्यांशी जुळवून घेताना सर्व खेळाडूंचा विशेष कस लागणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: With few days to go for ipl 2020 here is all you need to know about venues in uae psd

Next Story
IPL 2020 साठी रवाना झालेल्या खेळाडूंना BCCIची ‘वॉर्निंग’
ताज्या बातम्या