महिला एकदिवसीय विश्वचषकातील साखळी फेरीतील २० वा सामना पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या संघात झाला. हा सामना पाकिस्तानने ८ गडी राखून जिंकला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना थांबला होता. त्यानंतर समितीने हा सामना २० षटकांचा करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मरुफचा हा निर्णय योग्य ठरला. वेस्ट इंडिजला २० षटकात ७ गडी गमवून ८९ धावाच करता आल्या आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी ९० धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानने हे आव्हान १८ षटकं आणि ५ चेंडूत २ गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात निदा दारने ४ षटकात १० धावा देऊन ४ गडी बाद केले. महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील पाकिस्तान संघाचा हा पहिला विजय आहे.

पाकिस्तानचा डाव
वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या ९० धावांचा पाठलाग करताना मुनिबा अली आमि सिद्रा अमिन यांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र संघाच्या २२ धावा असताना सिद्रा अमिन वैयक्तित ८ धावा करून बाद झाली. अफी फ्लेचरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. त्यानंर बिसमाह मरुफसोबत मुनिबा अलीची जोडी जमली. मात्र मुनिबा ३७ धावांवर असताना शकेरा सेलमनच्या गोलंदाजीवर बाद झाली. डिएन्ड्रा डोट्टीनने तिचा झेल घेत तंबूत पाठवलं. मुनिबाने ४३ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. त्यानंतर बिसमा मरुफ आणि ओमैमा सोहेल जोडीनं संघाला विजय मिळवून दिला. बिस्माहने २० धावा, तर ओमैमाने २२ धावांची नाबाद खेळी केली.

Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

वेस्ट इंडिज महिला संघ: डिएन्ड्रा डोट्टीन, हेले मॅथ्यू, स्टेफनी टेलर, शेमिनी कॅम्फेल, चेडीन नेशन, कासिया नाईट, चिनले हेन्री, एफी फ्लेचर, अलिया अलेन, अनिसा मोहम्मद, शकेरा सेलमन

पाकिस्तानचा महिला संघ: मुनीबा अली, सीड्रा अमीन, बिस्माह मरूफ, ओमैमा सोहेल, निदा दार, अलिया रियाझ, फातिमा साना, सिद्रा नवाज, डायना बेग, नश्रा संधू, अनम अमिन