scorecardresearch

महिला प्रीमियर लीग क्रिकेट: यूपी वॉरिसर्यची आगेकूच निश्चित!

सोमवारी दुपारच्या सत्रात ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातने दिलेले १७९ धावांचे आव्हान यूपीने १९.५ षटकांत गाठले.

Grace Harris
(ग्रेस हॅरिस)

मुंबई : ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्रेस हॅरिसच्या (४१ चेंडूंत ७२ धावा) झंझावाती खेळीच्या बळावर यूपी वॉरियर्सने सोमवारी महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सामन्यात गुजरात जायंट्सवर तीन गडी आणि एक चेंडू राखून निसटता विजय मिळवला. या विजयासह यूपी संघाचे बाद फेरीतील स्थान निश्चित झाले आहे.

सोमवारी दुपारच्या सत्रात ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातने दिलेले १७९ धावांचे आव्हान यूपीने १९.५ षटकांत गाठले. यूपीची एकवेळ ३ बाद ३९ अशी स्थिती होती. मात्र, हॅरिस आणि ताहलिया मॅकग्रा (३८ चेंडूंत ५७) या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूंनी ८८ धावांची भागीदारी रचताना यूपीला विजयाचा मार्ग दाखवला. हॅरिसने ७२ धावांच्या खेळीत ७ चौकार व ४ षटकार, तर मॅकग्राने ११ चौकार मारले. या निकालामुळे यूपी संघाने मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्ससह बाद फेरीत स्थान मिळवले. गुजरात आणि बंगळूरु संघांचे आव्हान संपुष्टात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 01:00 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या