मुंबई : राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या भारतातील दोन प्रमुख शहरांच्या संघांना पहिल्या महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचे ऐतिहासिक जेतेपद पटकावण्याची संधी मिळणार आहे. रविवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये ‘डब्ल्यूपीएल’ची अंतिम लढत रंगणार आहे.

ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीग आणि इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ या स्पर्धाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच भारतात ‘डब्ल्यूपीएल’चा प्रयोग करण्यात आला. हा प्रयत्न यशस्वी ठरला असून स्पर्धेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. तसेच सामन्यागणिक महिला क्रिकेटचा आणि खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जा उंचावल्याचे पाहायला मिळाले आहे. आता रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत दोनही संघ दर्जेदार खेळ करतील अशी चाहत्यांचा नक्कीच आशा असेल.

Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष
rishbh pant
Ipl 2024, LSG vs DC: दिल्लीला कामगिरीत सुधारणेची आशा! आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान; राहुल, पंतकडे लक्ष
Rohit Sharma Ishan Kishan Romario Shepherd Gerald Coetzee Tim David contributed to MI win
IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या पहिल्यावहिल्या विजयात ‘या’ पाच खेळाडूंनी बजावली महत्त्वाची भूमिका
Today Mumbai Indians vs Delhi Capitals match in Indian Premier League IPL MI VS DC 2024 sport news
Ipl match, DC vs MI: मुंबईला विजयी लय सापडणार? आज घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान; हार्दिक, सूर्यकुमारकडे लक्ष

यंदाच्या हंगामात मुंबई आणि दिल्ली हे सर्वोत्तम कामगिरी करणारे दोन संघ आहेत. दोनही संघांनी साखळी फेरीत आठपैकी सहा सामने जिंकले होते. मात्र, सरस निव्वळ धावगतीमुळे दिल्लीने गुणतालिकेत अग्रस्थान मिळवताना थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबईला यूपी वॉरियर्सविरुद्ध ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात खेळावे लागले. मात्र, मुंबईने हा अडथळा सहज पार केला. नॅट स्किव्हर-ब्रंट आणि इजी वॉन्गच्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर मुंबईने यूपीला ७२ धावांनी धूळ चारताना अंतिम फेरीत धडक मारली. परंतु मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामना चुरशीचा होणे अपेक्षित आहे.

साखळी फेरीतील एका सामन्यात मुंबईने दिल्लीवर आठ गडी राखून मात केली होती. मात्र, उभय संघांतील दुसऱ्या सामन्यात दिल्लीने नऊ गडी राखून विजयाची नोंद केली होती. अखेरीस हाच विजय दिल्लीसाठी निर्णायक ठरला आणि त्यांचा थेट अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा झाला.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबईच्या संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. या मैदानावर मुंबईने आपले तीनही सामने जिंकले आहेत. दिल्लीला दोन विजय मिळवण्यात यश आले, पण त्यांनी एक सामना गमावला. या दोनही संघांमध्ये दर्जेदार फलंदाज आणि गोलंदाज असून गुणवान अष्टपैलूंची संख्याही मोठी आहे. त्यामुळे कोणत्या संघाचे खेळाडू आपली कामगिरी उंचावतात आणि आपल्या संघाला पहिल्या ‘डब्ल्यूपीएल’चे जेतेपद मिळवून देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

* वेळ : सायं. ७.३० वाजता

* थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१

कर्णधार हरमनप्रीत, मॅथ्यूजची चिंता

मुंबईची अष्टपैलू नॅट स्किव्हर-ब्रंट पूर्णपणे लयीत आहे. यूपीविरुद्ध तिने ३८ चेंडूंतच नाबाद ७२ धावांची खेळी केली. मात्र, मुंबईला कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सलामीवीर हेली मॅथ्यूज यांच्या कामगिरीची चिंता असेल. या दोघींनी स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती. परंतु गेल्या तीन सामन्यांत मिळून मॅथ्यूज व हरमनप्रीत यांना ३० धावांचा टप्पा पार करता आलेला नाही. तसेच मॅथ्यूजची सलामीची साथीदार यास्तिका भाटिया चांगल्या सुरुवातीचे मोठय़ा खेळीत रूपांतरण करण्यात अपयशी ठरते आहे. या तिघींनी आपली कामगिरी उंचावणे गरजेचे आहे. स्किव्हर-ब्रंटसह अमेलिया करचे अष्टपैलू योगदान मुंबईसाठी निर्णायक ठरते आहे. इंग्लंडची वेगवान गोलंदाज इजी वॉन्गनेही मुंबईच्या यशात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे डावखुरी फिरकी गोलंदाज सैका इशकने (९ सामन्यांत १५ बळी) स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

लॅनिंग, कॅपवर मदार

कर्णधार मेग लॅनिंग आणि दक्षिण आफ्रिकन अष्टपैलू मॅरिझान कॅपवर दिल्लीच्या संघाची मदार असेल. लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने नुकतेच विक्रमी पाचव्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद मिळवले होते. आता तिचा दिल्लीला ‘डब्ल्यूपीएल’चा चषक मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. लॅनिंगने (५१.६६च्या सरासरीने ३१० धावा) यंदाच्या हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली असून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ती अव्वल स्थानावर आहे. तिला सलामीची साथीदार शफाली वर्माची चांगली साथ मिळते आहे. जेमिमा रॉड्रिग्जच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे. अष्टपैलू कॅपचे (आठ सामन्यांत १५९ धावा व ९ बळी) योगदान दिल्लीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. तसेच गेल्या सामन्यात अ‍ॅलिस कॅप्सीने अप्रतिम कामगिरी केल्याने तिचा आत्मविश्वास उंचावला असेल.