उपांत्य फेरीत पराभवामुळे मनीषा, परवीनला कांस्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : भारताच्या निखत झरीनने (५२ किलो) वर्चस्वपूर्ण विजयासह बुधवारी इस्तंबूल येथे चालू असलेल्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. परंतु उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यामुळे मनीषा मौन (५७ किलो) आणि परवीन हुडा (६३ किलो) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

उपांत्य सामन्यात निखतने आत्मविश्वासाने खेळ करीत ब्राझिलच्या कॅरोलिन डी अल्मेडाला ५-० असे सहज नामोहरम केले. कनिष्ठ विश्वविजेत्या निखतने संयमी खेळाचे प्रदर्शन करीत कॅरोलिनवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. पण, मनीषाने टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या इटलीच्या इरमा टेस्टाकडून ०-५ अशी हार पत्करली, तर परवीनने युरोपियन कांस्यपदक विजेत्या आर्यलडच्या एमी ब्रॉडहस्र्टकडून १-४ असा पराभव पत्करला.

२०१९मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या मनीषाने दुसऱ्यांदा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळताना ताकदीने फटके खेळत तांत्रिक गुणाधिक्याच्या बळावर विजयासाठी प्रयत्नांची शर्थ केली. परंतु इरमापुढे तिचा निभाव लागला नाही.

आतापर्यंत सहा वेळा विजेती एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या महिला बॉिक्सगपटूंनी जागतिक विजेतेपदे पटकावली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women s world boxing championships nikhat zareen storms into final zws
First published on: 19-05-2022 at 02:42 IST