scorecardresearch

Womens T20 WC 2023: पाकिस्तानच्या दारुण पराभवामुळे भारताचं मोठं नुकसान; फायनलमध्ये जाण्यासाठी द्यावी लागणार अग्निपरीक्षा

Womens T20 World Cup Updates: पाकिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव करून इंग्लंड ६ गुणांसह गुणतक्त्यात अव्वल ठरला. उपांत्य फेरीत त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल, तर उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल.

Women T20 WC India suffered a huge loss due to Pakistan's defeat
भारतीय महिला संघ (फोटो-ट्विटर)

Womens T20 World Cup 2023: मंगळवारी महिला टी-२० विश्वचषकात इंग्लंडने पाकिस्तानवर ११४ धावांनी मोठा विजय नोंदवला. पाकिस्तानच्या या दारुण पराभवाचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. कारण जर पाकिस्तान संघाने इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत केले असते, तर इंग्लंडचा संघ भारतापेक्षा ६ गुणांनी कमी नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला असता. अशा परिस्थितीत भारत ब गटातील अव्वल ठरला स्थानी राहिला असता.

ज्यामुळे भारताचा सामना अ गटातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील दक्षिण आफ्रिकेशी झाला असता. ज्यांना लीग टप्प्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र पाकिस्तानच्या मानहानीकारक पराभवाने सर्व समीकरणे बदलली असून आता भारताचा सामना विजयाच्या रथावर स्वार असलेल्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ज्यांनी या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही.

दोन्ही संघांचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास –

भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ७ विकेटने पराभव केला होता. वेस्ट इंडिजचा ६ गडी राखून पराभव केला होता, पण तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने त्यांचा ११ धावांनी पराभव केला. यानंतर, शेवटच्या साखळी सामन्यात, संघाने डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार आयर्लंडचा ५ धावांनी पराभव केला.

ऑस्ट्रेलिया हा स्पर्धेतील अ गटातील पहिला संघ ठरला आहे, ज्याने त्यांचे चारही साखळी सामने जिंकले आहेत. ब गटात इंग्लंडने हा पराक्रम केला. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ९७ धावांनी पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव केला. श्रीलंकेच्या संघाचा १० गडी राखून धुव्वा उडवला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी राखून पराभव करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

उपांत्य फेरीतील संघ –

भारताने चारपैकी तीन सामने जिंकले आणि गट दोनमध्ये सहा गुणांसह दुसरे स्थान पटकावले. गुरुवारी उपांत्य फेरीत त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल, त्यांनी गट एक मधील सर्व चार सामने जिंकून आठ गुणांसह पहिले स्थान मिळवले. दुसऱ्या गटात इंग्लंडने चारही सामने जिंकल्याने त्यांचे आठ गुण आहेत. उपांत्य फेरीत त्याची लढत गट एक मधील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होईल.

हेही वाचा – WPL Title Sponsor: IPL पाठोपाठ WPLला मिळाला ‘हा’ टायटल स्पॉन्सर; बीसीआयसोबत झाला तब्बल पाच वर्षाचा करार

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे, तरन्यूलँड्स मैदानावर नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे इंग्लंडने ५ गडी गमावून २१३ धावा केल्या होत्या, याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान २० षटकांत ९ विकेट गमावून केवळ ९९ धावा करू शकला. उपांत्य फेरीत दाखल झालेला इंग्लंड गट दोनमध्ये अपराजित आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 11:08 IST