पीटीआय, नवी दिल्ली : महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला दोन महिनेच शिल्लक असताना भारताचा मुख्य प्रशिक्षक रमेश पोवारची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) बदली करण्यात आली आहे. पोवारऐवजी महिला संघाचे मुख्य प्रशिक्षकपद कोण सांभाळणार हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले नसले, तरी भारताचा माजी खेळाडू ऋषिकेश कानिटकरची फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कानिटकरने यापूर्वी भारताच्या १९ वर्षांखालील पुरुष आणि भारत-अ संघांचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. आता ९ डिसेंबरपासून मायदेशात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून तो महिला संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळेल. तसेच पोवार ‘एनसीए’मध्ये फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करेल. ‘‘वरिष्ठ महिला संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) व्हीव्हीएस लक्ष्मणच्या साथीने काम करेल. ‘बीसीसीआय’च्या पुर्नरचना प्रक्रियेचा भाग म्हणून पोवार आता पुरुष क्रिकेटचा भाग बनेल,’’ असे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women team coach ramesh powar transferred nca rishikesh kanitkar as batting coach ysh
First published on: 07-12-2022 at 01:28 IST