नवी दिल्ली : आगामी महिला ट्वेन्टी-२० चॅलेंज स्पर्धेसाठी भारताच्या तारांकित क्रिकेटपटू स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांची अनुक्रमे ट्रेलब्लेजर्स, सुपरनोव्हाज आणि व्हेलोसिटी या संघांच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.  यंदा २३ मेपासून पुण्यात होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रत्येकी १६ सदस्यीय संघांची सोमवारी घोषणा केली.  मिताली राज, झुलन गोस्वामी आणि शिखा पांडे यांना कोणत्याही संघात स्थान मिळाले नाही.

संघ –

  • सुपरनोव्हाज : हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया, अलाना किंग, आयुष सोनी, चंदू व्ही, डिआंड्रा डॉटिन, हरलिन देओल, मेघना सिंग, मोनिका पटेल, मुस्कान मलिक, पूजा वस्त्रकार, प्रिया पुनिया, राशी कनोजिया, सोफी एक्लेस्टोन, सुने लुस, मानसी जोशी.
  • ट्रेलब्लेझर्स : स्मृती मानधना (कर्णधार), पूनम यादव, अरुंधती रेड्डी, हेली मॅथ्यूज, जेमिमा रॉड्रिग्ज, प्रियंका प्रियदर्शिनी, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, रिचा घोष, एस. मेघना, सायका इशाक, सलमा खातून, शर्मिन अक्तेर, सोफिया ब्राऊन, सुजाता मलिक, एसबी पोखरकर.
  • व्हेलोसिटी : दीप्ती शर्मा (कर्णधार), स्नेह राणा, शफाली वर्मा,  अयाबोंगा खाका, केपी नवगिरे, कॅथरीन क्रॉस, कीर्थी जेम्स, लॉरा वोल्व्हार्द, माया सोनावणे, नथाकन चंथाम, राधा यादव, आरती केदार, शिवाली शिंदे, सिमरन बहादूर, यास्तिका भाटिया, प्रणवी चंद्रा.