पुणे : सलामीवीर डिएन्ड्रा डॉटिनच्या (४४ चेंडूंत ६२) अर्धशतकाच्या जोरावर सुपरनोव्हाज संघाने व्हेलोसिटीवर चार धावांनी मात करत महिलांच्या ट्वेन्टी-२० चॅलेंज क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुणे येथे झालेल्या अंतिम सामन्यात सुपरनोव्हाजने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना व्हेलोसिटीला २० षटकांत ८ बाद १६१ धावाच करता आल्या. त्यांच्या लॉरा वोल्व्हार्दने (४० चेंडूंत ६५) झुंजार खेळी केली. मात्र, तिला सिमरन बहादूर (नाबाद २०) वगळता इतरांची साथ लाभली नाही. सुपरनोव्हाजची फिरकीपटू अलाना किंगने (३/३२) प्रभावी मारा केला.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तत्पूर्वी, सुपरनोव्हाज संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १६५ अशी धावसंख्या उभारली. अर्धशतकवीर डॉटिनला प्रिया पुनिया (२८) आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने (४३) तोलामोलाची साथ दिली. व्हेलोसिटीच्या दीप्ती शर्मा (२/२०), केट क्रॉस (२/२९), सिमरन बहादूर (२/३०) यांनी प्रभावी मारा केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women twenty20 challenge cricket supernovas win beat velocity final dotin half century ysh
First published on: 29-05-2022 at 01:11 IST