India's women’s team become millionaires BCCI Secretary Jai Shah's declare five crores after signing the first World Cup | Loksatta

Women U19 WC: भारताच्या लेकी बनल्या करोडपती! पहिल्यावहिल्या विश्वचषकावर नाव कोरताच BCCI सचिव जय शाहांची मोठी घोषणा

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी रविवारचा (दि. २९ जानेवारी) दिवस खूपच महत्त्वाचा ठरला. या पहिल्यावहिल्या विजयासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

Women U19 WC: India's women’s team become millionaires BCCI Secretary Jai Shah's declare five crores after signing the first World Cup
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

BCCI Secretary Jai Shah’s declare five crores: भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी रविवारचा (दि. २९ जानेवारी) दिवस खूपच महत्त्वाचा ठरला. या दिवशी १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला त्यात टीम इंडियाने इंग्लंडला अक्षरशः लोळवत ७ गडी राखून धूळ चारली आणि पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला धोबीपछाड देत अंडर-१९ विश्वचषकाची पहिली आवृत्ती आपल्या नावावर केली.

या पहिल्यावहिल्या विजयासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. त्यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात की, “भारतातील महिला क्रिकेटची प्रगती होत आहे आणि या विश्वचषक विजयाने महिला क्रिकेटचा दर्जा काही अंशांनी उंचावला आहे. संपूर्ण टीम आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षीस रक्कम म्हणून ५ कोटी रुपये जाहीर करताना मला आनंद होत आहे. हे निश्चितच नव्या वाटा निर्माण करणारे वर्ष आहे.”

भारतीय महिलांनी पहिली वहिली आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मुलींना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयाच्या जल्लोष करण्याचे निमंत्रण दिले अन् संघाला ५ कोटींच्या बक्षीस रकमेची घोषणा केली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला टी२० वर्ल्ड कप जिंकला होता आणि आज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील पोरींनी तसाच पराक्रम केला.

भारताची कर्णधार शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षांखालील महिलांनी वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात चमकदार खेळ करताना भारताच्या पोरींनी इंग्लंडची घसरगुंडी उडवली. तितास संधू, अर्चना देवी व पार्श्वी चोप्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत इंग्लंडच्या मुलींच्या संघाची वाईट अवस्था केली. इंग्लंडचा संघ ६८ धावांत तंबूत परतला. संधूने पहिल्याच षटकात इंग्लंडच्या लिबर्टी हीपला (०) स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या षटकात अर्चना देवीने इंग्लंडच्या निआम्ह हॉलंडचा (१०) त्रिफळाचीत केले.

हेही वाचा: Women U19 WC: ‘म्हारी छोरी छोरोसे…!’ भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर ७ गडी राखून दणदणीत विजय, पहिल्याच टी२० विश्वचषकावर कोरले नाव

कर्णधार ग्रेस स्क्रीव्हन्सला (४) देवीने बाद करून इंग्लंडला मोठा धक्का दिला. संधूने सामन्यातील दुसरी विकेट घेताना सेरेन स्मेलची विकेट घेतली. त्यानंतर चोप्राने दोन धक्के दिले. गोंधळलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंनी विकेट फेकल्या. जॉसी ग्रोव्हेस ( ४) धावबाद झाली. शफालीने इंग्लंडला आठवा धक्का देताना हॅना बेकरला (०) माघारी पाठवले. मन्नत कश्यपने नववा धक्का देताना अॅलेक्सा स्टोनहाऊसची (११) विकेट घेतली. सोनम यादवने शेवटची विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 20:36 IST
Next Story
Women U19 WC: ‘म्हारी छोरी छोरोसे…!’ भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर ७ गडी राखून दणदणीत विजय, पहिल्याच टी२० विश्वचषकावर कोरले नाव