Women U19 WC: The world champion team will be felicitated at Narendra Modi Stadium who will witness the glory of India's womens team | Loksatta

Women U19 WC: विश्वविजेत्या संघाचा होणार भव्य सत्कार! भारताच्या लेकींच्या गौरवाचा नरेंद्र मोदी स्टेडियम होणार साक्षीदार

पहिल्यावहिल्या अंडर-१९ महिला विश्वचषक विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघासाठी भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी२० दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवर करण्यात येणार आहे.

Women U19 WC: The world champion team will be felicitated at Narendra Modi Stadium who will witness the glory of India's womens team
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

BCCI Secretary Jai Shah’s declare award ceremoney at Ahmedabad१९: दक्षिण आफ्रिका येथे खेळल्या जात गेलेल्या महिला अंडर १९ टी२० विश्वचषकात अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला गेला. भारतीय संघाने या अंतिम सामन्यात जबरदस्त खेळ दाखवत इंग्लंडवर ७ गडी राखून विजय मिळवला. यासोबतच या पहिल्या विश्वचषकाचा मानकरी भारतीय संघ ठरला. कोणत्याही स्तरावरील भारतीय महिला क्रिकेट संघाचे हे पहिले विश्वविजेतेपद आहे.टीम इंडियाने इंग्लंडला अक्षरशः लोळवत ७ गडी राखून धूळ चारली आणि पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला धोबीपछाड देत अंडर-१९ विश्वचषकाची पहिली आवृत्ती आपल्या नावावर केली.

भारतीय महिलांनी अंडर-१९ विश्वचषक जिंकल्यानंतर जय शाह यांनी संघाचे ट्विट करून अभिनंदन केले. त्यात ते म्हणतात, “अंडर-१९ विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन. आमच्या युवा क्रिकेटपटूंनी देशाला अभिमान वाटावा अशी एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे. या मोठ्या आणि आनंदाच्या प्रसंगामुळे तरुण महिला खेळाडू केवळ भारावून गेले नाहीत हे त्यांच्या जमिनीवर पाय घट्ट रोवून उभ्या असण्याचा स्वभाव दाखवून देतो.”

महिला विश्वविजेत्या संघाचा होणार भव्य सत्कार

भारतीय महिलाच्या अंडर-१९ विश्वचषकातील विजयी कामगिरी नंतर त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. न्यूझीलंड सोबत सुरू असलेल्या मालिकेतील तिसऱ्या टी२० आधी नरेंद्र मोदी स्टेडियमवर १ फेब्रुवारी रोजी हा सोहळा होणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यात ते म्हणतात,”मी शफाली वर्मा आणि तिच्या विजयी संघाला आमंत्रित करतो. ती आणि तिचा विजयी संघ आमच्यासोबत नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे सहभागी होईल आणि १ फेब्रुवारी रोजी तिसऱ्या टी२० चे साक्षीदार होईल. ही अतुलनीय कामगिरी साजरी करण्यासाठी निश्चितच उत्सवाची गरज आहे.”

धोनीच्या विक्रमाची केली बरोबरी

शफालीला क्रिकेट वर्तुळात लेडी भारताचा माजी सलामीवर वीरेंद्र सेहवाग म्हणून ओळखले जाते. कारण आपल्या आक्रमक खेळीने तिने अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत. या शेफालीकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. शेफालीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव होता. हा अनुभव तिने पणाला लावला आणि भारताला विश्वचषक जिंकवून दिला. पण हा विश्वचषक जिंकवत शफालीने आता इतिहास रचल्याचे समोर आले आहे. धोनीने भारताला २००७ साली पहिला टी२० विश्वचषक जिंकवून दिला होता. महिला क्रिकेटमध्ये यापूर्वी भारतीय संघाला कधीही टी२० विश्वचषक जिंकता आला नव्हता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताला आयसीसी स्पर्धेतील जेतेपद कधीच मिळाले नव्हते. त्यामुळे भारताचा महिला संघ हा आयसीसीच्या जेतेपदाचा दुष्काळ अनुभवत होता. पण यावेळी भारताच्या युवा (१९-वर्षांखालील) संघाने विश्वचषकाला गवसणी घातली. भारताचे हे आयसीसीच्या स्पर्धेतील पहिले जेतेपद आहे, त्याचबरोबर भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे भारतासाठी हा विजय खास आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 21:06 IST
Next Story
Women U19 WC: भारताच्या लेकी बनल्या करोडपती! पहिल्यावहिल्या विश्वचषकावर नाव कोरताच BCCI सचिव जय शाहांची मोठी घोषणा