नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदकविजेत्या लवलिना बोरगोहेनसह साक्षी चौधरीने सोमवारी महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारताची अन्य एक खेळाडू प्रीतीला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.हरियाणाच्या २३ वर्षीय साक्षीने ५२ किलो वजनी गटात गतवर्षी आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या कझाकस्तानच्या झजीरा उराकबाएवाचा आणि लवलिनाने मेक्सिकोच्या व्हेनेसा ऑर्टिझचा पराभव केला. दोघींच्या खेळात निर्विवाद वर्चस्व राहिल्याने पंचांना त्यांच्या बाजूने ५-० असा कौल देताना फारसा विचार करावा लागला नाही.

जागतिक स्पर्धेत प्रथमच वजन गट बदलून खेळणाऱ्या लवलिनाने पदकाचा रंग बदलण्याच्या मोहिमेस अपेक्षित सुरुवात केली. आतापर्यंत जागतिक स्पर्धेत कांस्यपदकावर समाधानी राहिलेल्या लवलिनाला आता सुवर्णपदकाची आस असून, सोमवारी लवलिनाचा खेळ तसाच झाला. उंचीने छोटय़ा असलेल्या व्हेनेसाला लवलिनाने सहज पराभूत केले. आपल्या उंचीचा फायदा घेत लवलिनाने व्हेनेसावर सातत्याने ‘पंचेस’ आणि ‘जॅब’चा वापर केला. बचाव करताना व्हेनेसाला दूर ठेवण्यात लवलिना यशस्वी झाली आणि तेथेच तिचा विजय निश्चित झाला.

Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

त्याआधी साक्षीनने झजीराचा सहज पराभव केला. आक्रमक पवित्रा राखलेल्या साक्षीला दूर ठेवण्यासाठी झजीराने प्रयत्न केले. मात्र, साक्षीने पदलालित्याचे सुरेख प्रदर्शन करताना झजीराला कोंडीत पकडले.५४ किलो वजनी गटात प्रीतीला थायलंडच्या जुटामसकडून पराभवाचा सामना करावा लागला. पुढील फेरीत साक्षीची गाठ आता चीनच्या वू यू कीशी पडेल. लवलिनाचा सामना अग्रमानांकित ग्रामाने रेडी अॅडोसिंडाशी होईल.