महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा लांबणीवर

राष्ट्रीय स्पर्धेत ७० किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या अरुंधती चौधरीने लवलिनाच्या थेट निवडीवर आक्षेप घेताना दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.

भारतीय संघात स्थानासाठी निवड चाचणी होण्याची शक्यता

टर्की येथे होणारी महिला जागतिक अजिक्यपद बॉक्सिंग स्पर्धा पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत लांबणीवर पडली असून भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी  महिला बॉंक्सगपटूंना आता निवड चाचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

महिला जागतिक अजिक्य पद बॉक्सिंग स्पर्धा टर्कीतील इस्तंबूल शहरात यावर्षी ४ ते १८ डिसेंबर या कालावधीत खेळवली जाणार होती. मात्र, या शहरातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय बॉंक्सग संघटनेने (एआयबीए) जाहीर केले. या स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेतील सर्व वजनी गटांतील विजेत्या खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार होत्या. केवळ ७० किलो वजनी गट याला अपवाद होता. या वजनी गटात टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लवलिना बोरगोहेनला भारतीय संघात थेट प्रवेश देण्यात आला. मात्र, त्यामुळे वादाला तोंड फुटले.

राष्ट्रीय स्पर्धेत ७० किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या अरुंधती चौधरीने लवलिनाच्या थेट निवडीवर आक्षेप घेताना दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने भारतीय बॉक्सिंग महासंघाला नोटीस बजावली. याचे उत्तर देताना महासंघाने, बोरगोहेनची निवड ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी आणि जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या स्थानाच्या आधारे करण्यात आल्याचे सांगितले. आता जागतिक स्पर्धा लांबणीवर पडल्याने निवड चाचणी होणे अपेक्षित असून यात अरुंधतीसह सहा वेळची जगज्जेती मेरी कोम आणि सिमरनजीत कौर यांना संधी मिळू शकेल. मेरी राष्ट्रीय स्पर्धेत खेळली नाही, तर सिमरनजीतला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Women world boxing championships on hold akp

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या