Women’s Asia Cup T20 Final Highlights Updates: बांगलादेशातील सिल्हेट येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषकातील अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाने विजयी षटकार खेचत भारताने आशिया चषक जिंकला. तब्बल आठ गडी राखून श्रीलंकेचा दारूण पराभव केला. २५ चेंडूत ५० धावांची खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहचवले. श्रीलंकेची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. पहिल्या पॉवर प्ले मध्ये श्रीलंकेचा निम्मा संघ माघारी परतला होता एका क्षणी ५० धावा तरी होतील का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. टीम इंडियाच्या धारदार गोलंदाजीसमोर एकही फलंदाज टिकू शकला नाही. श्रीलंकेकडून फक्त दोघीनाच दोन आकडी संख्या गाठता आली. इनोका रणविरा आणि ओधाडी रणसिंघे यांनी अनुक्रमे १८ आणि १३ धावा केल्या. भारताकडून रेणुका सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी तिला साथ देत प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

या स्पर्धेच्या टी२० स्वरूपातील बदलानंतर प्रथमच अंतिम फेरीत पोहोचलेल्या श्रीलंकेच्या संघाला विजेतेपदाची सुरुवात करायची आहे पण ती होताना काही दिसली नाही. टीम इंडियाचे पारडे श्रीलंकेविरुद्ध जड आहे. आतापर्यंत दोन्ही संघ टी२० मध्ये २२ वेळा समोरासमोर आले आहेत. ज्यामध्ये भारताने १७ वेळा विजय मिळवला असून श्रीलंकेने फक्त चार सामने जिंकले आहेत तर एका सामन्याचा निकालच लागला नाही. त्याचबरोबर भारत सलग आठव्यांदा आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. श्रीलंका पाचव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यांनी १४ वर्षानंतर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Live Updates

IND-W vs SL-W Asia Cup T20 2022 Highlights Updates: भारत विरुद्ध श्रीलंका टी२० महिला आशिया चषक फायनल हायलाईटस् अपडेट्स

15:13 (IST) 15 Oct 2022
IND-W vs SL-W: भारताने आशिया चषक जिंकला

स्मृती मंधानाने विजयी षटकार खेचत भारताने आशिया चषक जिंकला.

भारत ७१-२

14:56 (IST) 15 Oct 2022
IND-W vs SL-W: जेमिमा रॉड्रिग्स बाद

४ चेंडूत २ धावा करत जेमिमा रॉड्रिग्स यष्टिचीत झाली.

भारत ३५-२

14:51 (IST) 15 Oct 2022
IND-W vs SL-W: भारताला पहिला धक्का

सलामीवीर शफाली वर्मा अवघ्या ५ धावा करून झाली बाद

भारत ३२-१

14:47 (IST) 15 Oct 2022
IND-W vs SL-W: स्मृतीने मारला शानदार षटकार

भारतीय सलामीवीराची धडाकेबाज सुरुवात, स्मृती मंधानाने शानदार षटकार खेचत इरादे स्पष्ट केले.

भारत २५-०

14:40 (IST) 15 Oct 2022
IND-W vs SL-W: टीम इंडियाचे सलामीवीर मैदानात

भारताचे सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा धावांचा पाठलाग करण्यासाठी आले मैदानात, पहिल्या षटकात

भारत ४-०

14:27 (IST) 15 Oct 2022
IND-W vs SL-W: भारताला विजयासाठी ६५ धावांची गरज

श्रीलंकेने निर्धारित २० षटकात अवघ्या नऊ गड्यांच्या बदल्यात ६५ धावा केल्या. इनोका रणविराच्या १८ धावांच्या खेळीने भारतासमोर ६६ धावांचे आव्हान ठेवले.

श्रीलंका ६५-९

14:15 (IST) 15 Oct 2022
IND-W vs SL-W: श्रीलंकेच्या ५० धावा होतील का?

श्रीलंकेच्या ५० धावा होतील का अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. सुगंधा कुमारी ६ धावांवर त्रिफळाचीत झाली.

श्रीलंका ४३-९

14:00 (IST) 15 Oct 2022
IND-W vs SL-W: श्रीलंकेचा आठवा गडी बाद

दोन आकडी संख्या गाठणारी एकमेव खेळाडू ओधाडी रणसिंघे ही १३ धावा करत यष्टिचीत झाली.

श्रीलंका ३२-८

13:46 (IST) 15 Oct 2022
IND-W vs SL-W: श्रीलंकेची गळती सुरूच, सातवा गडी बाद

श्रीलंकेची गळती सुरूच असून मालाशनी शेंगा झेलबाद झाली. तिला भोपळाही फोडता आला नाही. स्नेह राणाने तिला बाद केले.

श्रीलंका २५-७

13:37 (IST) 15 Oct 2022
IND-W vs SL-W: श्रीलंकेचा सहावा गडी बाद

श्रीलंकेचा सहावा गडी बाद झाला. निलाक्षी डी सिल्वाला ६ धावांवर राजेश्वरी गायकवाडने त्रिफळाचीत केले.

श्रीलंका १८-६

13:30 (IST) 15 Oct 2022
IND-W vs SL-W: श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत

श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. कविशा दिलहरी अवघी एक धाव करून बाद झाली. रेणुका सिंगने तिला त्रिफळाचीत केले.

श्रीलंका १६-५

13:22 (IST) 15 Oct 2022
IND-W vs SL-W: श्रीलंकेची खराब सुरुवात, परेरा बाद

श्रीलंकेची खराब सुरुवात झाली असून हसिनी परेरा बाद झाली. तिला भोपळाही फोडता आला नाही. रेणुका सिंगने तिला बाद केले.

श्रीलंका ९-४

13:20 (IST) 15 Oct 2022
IND-W vs SL-W: श्रीलंका संघ अडचणीत तिसरा धक्का

एकापाठोपाठ तीन गडी बाद झाल्याने श्रीलंकन संघ अडचणीत सापडला. अनुष्का संजीवनीला पूजा वस्त्रकारने धावबाद केले.

श्रीलंका ९-३

13:18 (IST) 15 Oct 2022
IND-W vs SL-W:श्रीलंकेला दुसरा धक्का

चौथ्या षटकात श्रीलंकेला दुसरा धक्का बसला. हर्षिता समरविक्रमा अवघी एक धाव काढून झेलबाद झाली.

श्रीलंका ९-२

13:14 (IST) 15 Oct 2022
IND-W vs SL-W: श्रीलंकेला पहिला धक्का

कर्णधार चमारी अटापट्टूच्या रूपाने श्रीलंकेला पहिला धक्का बसला. तिने १२ चेंडूत ६ धावा केल्या.

श्रीलंका ८-१

13:04 (IST) 15 Oct 2022
IND-W vs SL-W: अंतिम सामन्याला झाली सुरुवात

अंतिम सामन्याला सुरुवात झाली असून श्रीलंकन खेळाडू फलंदाजीला आले आहेत. पहिल्या षटकानंतर

श्रीलंका ३-०

12:47 (IST) 15 Oct 2022
IND-W vs SL-W: खेळपट्टी फलंदाजीला पोषक

बांगलादेशातील सिल्हेट मैदानावरील खेळपट्टी फलंदाजीला पोषक आहे. अंतिम सामन्यासाठी नवीन तयार करण्यात आली. अंजुम चोप्राने सांगितले की, १५० धावा उत्तम असतील.

IND-W vs SL-W Asia Cup T20 2022 Highlights Updates: भारत विरुद्ध श्रीलंका टी२० महिला आशिया चषक फायनल हायलाईटस् अपडेट्स

बांगलादेशातील सिल्हेट येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषक २०२२ मध्ये शनिवारी निश्चित नवा विजेता घोषित होणार आहे.