womens asia cup t20 2022 india vs malaysia match predictions zws 70 | Loksatta

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : शफालीच्या कामगिरीकडे लक्ष! ; आज भारतीय महिला संघाचा मलेशियाशी सामना

भारताच्या नजरा पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाकडे असून अधिकाधिक खेळाडूंना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : शफालीच्या कामगिरीकडे लक्ष! ; आज भारतीय महिला संघाचा मलेशियाशी सामना
भारताची सलामीवीर शफालीला गेल्या काही काळापासून धावांसाठी झगडावे लागले आहे

सिल्हेट (बांगलादेश)

श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत आपल्या मोहिमेची सकारात्मक सुरुवात करणाऱ्या भारतीय महिला संघाचा सोमवारी आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत मलेशियाशी सामना होणार आहे. या सामन्यात मोठा विजय साकारण्याचा भारताचा मानस असेल, त्यासोबतच सलामीवीर शफाली वर्माच्या कामगिरीवरही सर्वाचे लक्ष असेल.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या सामन्याकडे एखाद्या सराव सामन्यासारखे पाहू शकेल. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात मलेशियाचा नऊ गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघही या सामन्यात मोठा विजय मिळवणे अपेक्षित आहे. जेमिमा रॉड्रिग्जच्या खेळीमुळे भारताने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला नमवले होते. भारताच्या नजरा पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाकडे असून अधिकाधिक खेळाडूंना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

भारताची सलामीवीर शफालीला गेल्या काही काळापासून धावांसाठी झगडावे लागले आहे. १८ वर्षीय शफालीने गेल्या वर्षी मार्चपासून ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावलेले नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान तिने काही चांगल्या खेळी केल्या. मात्र, त्यानंतरच्या इंग्लंड दौऱ्यात तिला चमक दाखवता आली नाही. शफालीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन वर्षे झाली असून तिला खेळात सातत्य राखता आलेले नाही. मलेशियाच्या कमी अनुभवी गोलंदाजांविरुद्ध धावा करून आत्मविश्वास परत मिळवण्याचा शफालीचा प्रयत्न असेल.

रॉड्रिग्जने गेल्या सामन्यात आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. हरमनप्रीतलाही लय सापडली आहे, तर गेल्या सामन्यात अपयशी झालेली सलामीवीर स्मृती मानधना मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात किरण नवगिरेसारख्या नवख्या खेळाडूंनाही संधी मिळू शकते. गोलंदाजीचे योग्य संयोजन तयार करण्याकडेही भारतीय संघाचे लक्ष असेल. गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने रेणुका सिंह ठाकूरवर असेल.

* वेळ : दुपारी १ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
जागतिक टेबल टेनिस स्पर्धा : भारतीय पुरुष संघाचा जर्मनीला पराभवाचा धक्का

संबंधित बातम्या

FIFA WC 2022: मोरोक्कोच्या जादुई दोन गोलमुळे कॅनडा आणि बेल्जियम विश्वचषकातून बाहेर, क्रोएशिया बाद फेरीत दाखल
Video: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स
Shahid Afridi: “भारतात मिळणारे आदरातिथ्य पाकिस्तानपेक्षा…” शाहिद आफ्रिदीने दोन्ही देशात मिळणाऱ्या मान सन्मानाची केली तुलना
‘भाई, हा तर आमचा मुलगा आहे’, रवींद्र जडेजाला पाहून पीएम मोदी धोनीला म्हणाले, पाहा व्हिडिओ
PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या, रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने केले सात विश्वविक्रम

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ; प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे
अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे क्रिकेट सल्लागार समितीवर
महानगर क्षेत्रात लवकरच आपला दवाखाना ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
FIFA World Cup 2022: टय़ुनिशियाविरुद्ध अपात्र गोलबाबत फ्रान्स फुटबॉल महासंघाची तक्रार