ICC Women’s T20 World 2026 Full Schedule: आयसीसीने २०२६ मध्ये होणाऱ्या महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडकडे असणार आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना इंग्लंड विरूद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना १२ जून रोजी खेळवला जाईल. नुकताच आयसीसीकडून महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली होती. ५ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ भिडणार आहेत. या सामन्यानंतर क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत- पाकिस्तान सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.
आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत एकूण १२ संघ खेळताना दिसून येणार आहेत. पहिल्यांदाच आयसीसीने महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत संघांची संख्यावा वाढवली आहे. या स्पर्धेच्या स्वरुपाबद्दल बोलायचं झालं, तर १२ संघांची २ गटात विभागणी करण्यात आली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे.
या स्पर्धेतील पहिल्या गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत आणि पाकिस्तान ४ बलाढ्य संघांचा समावेश असणार आहे. तर पात्रता फेरी जिंकून येणाऱ्या २ संघांचा या गटात समावेश केला जाईल. तर वेस्टइंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका या ४ प्रमुख संघांचा दुसऱ्या गटात समावेश करण्यात आला आहे. यासह पात्रता फेरीतील सामने जिंकून येणाऱ्या २ संघांचा दुसऱ्या गटात समावेश केला जाईल. प्रत्येक गटातील टॉप २ मध्ये असणारे, उपांत्य फेरीत प्रवेश करतील. हे सामने ३० जून आणि २ जुलै रोजी खेळवला जाईल. तर स्पर्धेतील अंतिम सामना ५ जुलैला लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील सामने द ओव्हल, ब्रिस्टल काऊंटी ग्राऊंड, एजबॅस्टन, हॅम्पशायर बाऊल, हेडिंग्ले आणि लॉर्ड्सच्या मैदानावर रंगणार आहेत.
असं आहे या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक
इंग्लंड विरूद्ध श्रीलंका, १२ जून, एडबस्टन
वेस्टइंडिज विरूद्ध न्यूझीलंड , १३ जून,हॅम्पशायर बॉल
क्वालिफायर विरूद्ध क्वालिफायर, ओल्ड ट्रॅफर्ड
ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका, ओल्ड ट्रॅफर्ड
क्वालिफायर विरूद्ध क्वालिफायर, १४ जून, एडबस्टन
भारत विरूद्ध पाकिस्तान , एडबस्टन
न्यूझीलंड विरूद्ध श्रीलंका, १६ जून, हॅम्पशायर
इंग्लंड विरूद्ध क्वालिफायर, हॅम्पशायर
ऑस्ट्रेलिया विरूद्ध क्वालिफायर, १७ जून, हेडिंग्ले
भारत विरूद्ध क्वालिफायर, हेडिंग्ले
दक्षिण आफ्रिका विरूद्ध पाकिस्तान, एडबस्टन
वेस्टइंडिज विरूद्ध क्वालिफायर, १८ जून, हेडिंग्ले
न्यूझीलंड विरूद्ध क्वालिफायर, १८ जून, हॅम्पशायर
ऑस्ट्रेलिया विरूद्ध क्वालिफायर, २० जून, हॅम्पशायर
पाकिस्तान विरूद्ध क्वालिफायर, हॅम्पशायर
इंग्लंड विरूद्ध क्वालिफायर, हेडिंग्ले
दक्षिण आफ्रिका विरूद्ध भारत, २१ जून, ओल्ड ट्रॅफर्ड
वेस्टइंडिज विरूद्ध श्रीलंका, ब्रिस्टॉल काऊंटी ग्राऊंड
ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान, २३ जून, हेडिंग्ले
न्यूझीलंड विरूद्ध क्वालिफायर, ब्रिस्टॉल काऊंटी ग्राऊंड
श्रीलंका विरूद्ध क्वालिफायर, ब्रिस्टॉल काऊंटी ग्राऊंड
इंग्लंड विरूद्ध वेस्टइंडिज, २४ जून, लॉर्ड्स
भारत विरूद्ध क्वालिफायर, २५ जून, ओल्ड ट्रॅफर्ड
दक्षिण आफ्रिका विरूद्ध क्वालिफायर, ब्रिस्टॉल काऊंटी ग्राऊंड
श्रीलंका विरूद्ध क्वालिफायर, २६ जून, ओल्ड ट्रॅफर्ड
पाकिस्तान विरूद्ध क्वालिफायर, २७ जून, ब्रिस्टॉल काऊंटी ग्राऊंड
वेस्टइंडिज विरूद्ध क्वालिफायर, ब्रिस्टॉल काऊंटी ग्राऊंड
इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड, दि ओव्हल
दक्षिण आफ्रिका विरूद्ध क्वालिफायर, २८ जून, लॉर्ड्स
ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत, लॉर्ड्स
पहिली उपांत्य फेरी- ३० जून
दुसरी उपांत्य फेरी- २ जुलै
अंतिम सामना – ५ जुलै