पीटीआय, युजीन (अमेरिका) : भारताच्या मुरली श्रीशंकरला रविवारी जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील लांब उडी क्रीडा प्रकाराच्या अंतिम फेरीत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा श्रीशंकर हा पहिला भारतीय लांब उडीपटू ठरला होता. त्यामुळे त्याच्याकडून ऐतिहासिक पदकाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. मात्र, अंतिम फेरीत त्याला पात्रता फेरीतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अपयश आले. श्रीशंकरची ८.३६ मीटर अशी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. परंतु अंतिम फेरीतील तीन वैध उडय़ांमध्ये त्याला अनुक्रमे ७.९६ मी.,  ७.८९ मी. आणि ७.८३ मी. इतकेच अंतर गाठता आले. त्याच्या अन्य तीन उडय़ा ग्राह्य धरल्या गेल्या नाहीत.

२३ वर्षीय श्रीशंकरने शनिवारी आठ मीटर अंतर उडीची नोंद करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले होते. त्याला ब-गटात दुसरे स्थान मिळवण्यात यश आले होते.

d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत
Virat Creates History at Chinnaswamy Stadium
RCB vs LSG : विराटने चिन्नास्वामी स्टेडियमवर रचला इतिहास! अनोखं शतक झळकावणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
rohan bopanna and matthew ebden win miami open men s doubles title
मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद

चीनच्या जिआनन वँगने

(८.३६ मीटर) सुवर्ण, ग्रीसच्या ऑलिम्पिक विजेत्या मिल्तिआदिस तेन्टोग्लूने (८.३० मीटर) रौप्य, तर स्वित्र्झलडच्या सिमॉन एहमेरने (८.१६ मीटर) कांस्यपदक पटकावले.

पारूलकडून निराशा

महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस क्रीडा प्रकाराच्या पात्रता फेरीत भारताच्या पारूल चौधरीने ९:३८.०९ मिनिटे अशी सर्वोत्तम वैयक्तिक वेळ नोंदवली. मात्र, तिला पुढील फेरी गाठण्यात अपयश आले. पात्रतेच्या दुसऱ्या शर्यतीत (हिट) तिला १२व्या, तर एकूण ३१व्या स्थानावर समाधान मानावे लागले. तीन शर्यतींमधील अव्वल तीन धावपटू आणि त्यानंतरचे सर्वात वेगवान सहा धावपटू यांना अंतिम फेरीत स्थान मिळते.

१०० मीटर शर्यतीवर अमेरिकेचे वर्चस्व

जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीवर अमेरिकेने वर्चस्व गाजवले. २७ वर्षीय फ्रेड कर्लीने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली, तर त्याचे अमेरिकन सहकारी मार्विन ब्रेसी आणि ट्रेव्हॉन ब्रोमेल यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदके जिंकली. टोक्यो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या कर्लीला ९.८६ सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदक आपल्या नावे केले.