scorecardresearch

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांतची आगेकूच; साईप्रणीत पराभूत

स्पेन येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत १२व्या मानांकित श्रीकांतने स्पेनचा खेळाडू पाब्लो एबियनला २१-१२, २१-१६ असे सरळ गेममध्ये पराभूत केले.

भारतीय बॅर्डंमटनपटूंच्या जागतिक र्अंजक्यपद स्पर्धेतील आव्हानाची संमिश्र सुरुवात झाली. पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतने विजयी सलामी दिली, तर बी. साईप्रणीत पहिल्याच फेरीत गारद झाला.

स्पेन येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत १२व्या मानांकित श्रीकांतने स्पेनचा खेळाडू पाब्लो एबियनला २१-१२, २१-१६ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. दुसऱ्या फेरीत त्याच्यापुढे चीनच्या ली शी फेंगचे आव्हान असेल. मागील जागतिक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या साईप्रणीतला यंदा पहिल्याच फेरीत हॉलंडच्या मार्क कॅलजोकडून २१-१७, ७-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला.

पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी या जोडीवर पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या जोएल एल्पे आणि रॅस्मस किएर जोडीने १६-२१, १५-२१ अशी मात केली.

महिला दुहेरीत पूजा दांडू-संजना संतोष, पुरुष दुहेरीत अरुण जॉर्ज-संयम शुक्ला, तर मिश्र दुहेरीत वेंकट गौरव प्रसाद-जुही देवांगण आणि उत्कर्ष अरोरा-करिष्मा वाडकर या भारतीय जोड्यांचे आव्हानही पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World badminton championships srikanth advance saipranit defeated akp

ताज्या बातम्या