करोनाचा नवा उत्परिवर्तित विषाणू ‘ओमायक्रॉन’च्या भीतीमुळे इंडोनेशियन संघाने स्पेनमध्ये होणाऱ्या आगामी जागतिक र्अंजक्यपद बॅर्डंमटन स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिला आहे.

‘‘इंडोनेशियन बॅर्डंमटन संघ स्पेनमधील व्हेल्वा येथे १२ ते १९ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळणार नाही,’’ असे अखिल इंडोनेशियन बॅर्डंमटन महासंघाने (पीबीएसआय) बुधवारी जाहीर केले. इंडोनेशियाच्या संघात अँथनी र्गिंटग, जोनाथन क्रिस्टी यांसारख्या आघाडीच्या एकेरी खेळाडूंसह अव्वल मानांकित पुरुष दुहेरीतील जोडी केव्हिन संजया आणि मार्कस फेर्नाल्दी यांचा समावेश आहे.

‘‘आम्ही कोणताही धोका पत्करणार नाही. खेळाडूंची सुरक्षितता आणि आरोग्य आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. जागतिक स्पर्धेतून माघार घेण्याबाबत आम्ही खेळाडूंशी चर्चा केली आणि ते आमच्याशी सहमत होते. युरोपीय देशांत करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने इंडोनेशियन सरकारनेही आम्हाला परदेशातील मर्यादित स्पर्धांतच भाग घेण्याचे आवाहन केले आहे,’’ असे ‘पीबीएसआय’चे अधिकारी रिओनी मेनाकी यांनी सांगितले.

अग्रमानांकित मोमोटा मुकणार

दोन वेळचा गतविजेता केंटो मोमोटा पाठीच्या दुखापतीमुळे रविवारपासून सुरू होत असलेल्या जागतिक र्अंजक्यपद बॅर्डंमटन स्पर्धेला मुकणार आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या मोमोटाला मागील आठवड्यात जागतिक मालिकेच्या अंतिम टप्प्याआधी सराव करताना दुखापत झाली. त्यामुळे त्याला लक्ष्य सेनविरुद्ध सलामीची लढत अर्धवट सोडावी लागली होती.