World Cup 2019 : शेन वॉर्न म्हणतो ‘हा’ खेळाडू ठरेल विश्वचषकाचा हिरो

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ३० मे पासून

World Cup 2019 : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ३० मे पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत तुल्यबळ संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रत्येक संघ खेळाडूंची चाचपणी करत आहे. तर दुसरीकडे क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आणि जाणकार या स्पर्धेतील आपले अंदाज व्यक्त करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील मालिकावीराचा ‘किताब कोण पटकावले? याबद्दल अंदाज व्यक्तव्य केले आहे.

जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळता, तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमुळे दुखी होणं तुम्ही स्वतःहून टाळता. तुम्ही पुनरागमन करताना केवळ नेटमध्ये जाऊन आपल्या सहकाऱ्यांबरोबर सराव कधी सुरु करतो याकडे लक्ष देता. त्यामुळे स्मिथ आणि वॉर्नर हे दोघे दमदार पुनरागमन करतील, असा मला विश्वास आहे. आणि डेव्हिड वॉर्नर हाच यंदाच्या विश्वचषकाचा मालिकावीर ठरेल, असे वॉर्न म्हणाला.

World Cup 2019 : ‘…तर ऑस्ट्रेलिया पुन्हा ठरणार विश्वविजेता’; दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी

एखादा खेळाडू जेव्हा काही काळ क्रिकेटपासून दूर असतो, तेव्हा तो झोकात पुनरागमन करण्याचा विचार करूनच मैदानात उतरतो. मी माझ्या स्वतःच्या अनुभवाबद्दल सांगू इच्छितो. मी काही काळ खेळापासून दूर होतो. त्यावेळी मी पुनरागमन केले आणि अतिशय चांगली कामगिरी माझ्याकडून घडली. मी खेळण्यासाठी अत्यंत उत्सुक होतो. माझे शरीर आणि माझे मन दोन्हीही ताजेतवाने होते. त्यामुळे मी उत्तम कामगिरी करू शकलो, असे वॉर्न म्हणाला.

कधी कधी तुम्हाला कारकीर्दीत कठोर प्रसंगांना सामोरे जावे लागते, मात्र त्यामुळे खेळाडू म्हणून तुम्हालाच फायदा होतो. नव्या उमेदीने तुम्ही पुन्हा एकदा क्रिकेटसाठी तयार होता. माझ्याही कारकीर्दीत २००३मध्ये असा काळ आला होता. स्मिथ व वॉर्नर यांच्यातील धावांची भूक आता अधिक वाढलेली आपल्याला दिसून येईल. त्यामुळेच विश्वचषकात ते सर्वस्व पणाला लावतील. त्या दोघांनाही सूर गवसल्यास ऑस्ट्रेलियाला सलग दुसरा विश्वचषक जिंकण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही, असेही वॉर्नने सांगितले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: World cup 2019 australia shane warne david warner player of the tournament