scorecardresearch

IND vs AUS: विश्वचषक जिंकण्यासाठी पॅट कमिन्सने आयपीएलचा करार मोडला होता, वर्षभरापूर्वीचे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल

IND vs AUS Final 2023: पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने विश्वचषक २०२३चे विजेतेपद पटकावले आहे. फायनलनंतर पॅट कमिन्सचे एक ट्वीट व्हायरल होत आहे. नोव्हेंबर २०२२च्या या ट्वीटमध्ये कमिन्सने आयपीएलमध्ये न खेळण्याची घोषणा केली होती.

Pat Cummins had left IPL for the World Cup after becoming champion Kangaroo captain's 1 year old tweet went viral
फायनलनंतर पॅट कमिन्सचे एक ट्वीट व्हायरल होत आहे. सौजन्य- (ट्वीटर)

India vs Australia World Cup Final 2023: आयुष्यात अशी अनेक वळणे येतात जेव्हा तुम्हाला कठीण निर्णय घ्यावे लागतात, मोठे मन दाखवावे लागते. हा निर्णय त्यावेळी अवघड वाटू शकतो पण भविष्यात तुमचे आयुष्य बदलू शकते. असाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सबाबत घडला आहे. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी कमिन्सने एक कठीण निर्णय घेतला. त्याला ३७० दिवसांनी त्याचा लाभ मिळाला. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २०२३चा विश्वचषक जिंकला आहे.

कमिन्सने आयपीएल सोडले होते

पॅट कमिन्स आयपीएल २०२२मध्ये केकेआरचा भाग होता. फलंदाजी आणि गोलंदाजीत त्याने अप्रतिम कामगिरी केली. पण १५ नोव्हेंबर २०२२ रोजी कमिन्सने ट्वीट केले की, “तो आयपीएल २०२३मध्ये खेळणार नाही.” कमिन्सला आयपीएलच्या एक हंगाम खेळण्यासाठी ७.२५ कोटी रुपये मिळतात. कमिन्सने लिहिले होते की, ‘पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये मी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मी हा करार सोडण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. माझे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पुढील १२ महिन्यांसाठी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांनी भरलेले आहे, त्यामुळे अ‍ॅशेस मालिका आणि विश्वचषकापूर्वी थोडी विश्रांती घेतली जाईल.”

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
World Cup 2023: “मला माहित नाही की हा संघ…”; विश्वचषकापूर्वी हरभजन सिंगने टीम इंडियाच्या एकजुटीवर उपस्थित केला प्रश्न
World cup 2023 Updates
World Cup 2023: विश्वचषकापूर्वी शुबमन गिलनंतर ‘या’ अष्टपैलू खेळाडूने वाढवली भारताची डोकेदुखी; सराव सत्रात बोटाला झाली दुखापत
19th Asian Games Updates
Asian Games: भारतीय क्रिकेट संघ ॲथलीट्स व्हिलेजमध्ये दाखल, उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळण्यासाठी उतरणार मैदानात
IND vs AUS: Team India arrives in Rajkot for 3rd ODI Rohit Brigade ready to whitewash Australia watch Video
IND vs AUS: तिसर्‍या वन डेसाठी टीम इंडिया पोहोचली राजकोटला; ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्यासाठी रोहित ब्रिगेड सज्ज, पाहा Video

आयपीएल नंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनला

आयपीएलनंतर लगेचच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेतेपदाचा सामना खेळला गेला. यामध्येही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा होती. लंडनच्या ओव्हल मैदानावर झालेला तो सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तिथेही कमिन्स ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. यानंतर अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये जाऊन २-२ अशी बरोबरी साधून ट्रॉफी परत केली.

आता विश्वचषक विजेतेपद

ऑस्ट्रेलियाने आता पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली विश्वचषक २०२३चे विजेतेपद पटकावले आहे. कमिन्सने फलंदाजी आणि चेंडूने महत्त्वपूर्ण योगदान दिले. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन आणि उपांत्य फेरीत भारताविरुद्ध दोन विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही त्याने अवघ्या १४ चेंडूत ३७ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानविरुद्धच्या कठीण परिस्थितीत ६८ चेंडू खेळून त्याने ग्लेन मॅक्सवेलला साथ दिली होती. तो खेळपट्टीवर एक बाजू लावून उभा होता. उपांत्य फेरीतही त्याने नाबाद १४ धावा करत संघाला विजयापर्यंत नेले.

हेही वाचा: IND vs AUS Final: टीम इंडियाच्या पराभवानंतर कपिल देव यांनी रोहित शर्माचे कौतुक केले; म्हणाले, “अजून पुढे खूप यश प्रतीक्षेत…”

टीम इंडियाने या स्पर्धेतील सर्व गट सामने जिंकले आणि उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. याच संघाने या स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या गट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, मात्र अंतिम सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World cup 2023 370 days ago pat cummins took a difficult decision left rs 7 25 crore and made the team world champion avw

First published on: 20-11-2023 at 16:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×