ICC World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ऑनरिक नॉर्खिया पाठीच्या दुखापतीमुळे भारतात होणाऱ्या आगामी २०२३ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. सराव सत्रादरम्यान अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे २९ वर्षीय खेळाडूला २०१९च्या विश्वचषकालाही मुकावे लागले. रेव्हस्पोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, “गुडघ्याच्या दुखापतीमुळे सिसांडा मागाला देखील स्पर्धेत मुकल्याने दक्षिण आफ्रिकेच्या संधींना आणखी एक धक्का बसला आहे.”
दक्षिण आफ्रिकेच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक नॉर्खिया, ब्लूमफॉन्टेन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केवळ पाच षटके टाकू शकला कारण तो पाठीच्या आणि अंगठ्याच्या समस्येने त्रस्त आहे. त्याने आपल्या हिट-द-डेक गोलंदाजीतील कौशल्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी खूप सामने जिंकवून दिले आहेत. त्यामुळे तो विश्वचषक २०२३मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सिद्ध केले आहे मात्र, दुखापतीमुळे तो वर्ल्डकपला मुकणार आहे. नॉर्खियाने २२ एकदिवसीय सामन्यांमध्ये २७.२७च्या सरासरीने ३६ विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, मागालाने आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये २५.४च्या प्रभावी सरासरीने १४ विकेट्स घेतल्या आहेत. आता त्याच्या जागी अनुभवी अष्टपैलू अँडिले फेहलुकवायो बदली खेळाडूंपैकी एक असू शकतो. या अष्टपैलू खेळाडूने ७६ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर ८९ विकेट्स आहेत. लिझाद विल्यम्स आणि वेन पारनेल हे देखील समीकरणात येऊ शकतात. दक्षिण आफ्रिका ७ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ला ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारतात होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी खेळाडूंच्या दुखापती ही सर्वच संघांसाठी समस्या बनली आहे. प्रत्येक संघात असे काही खेळाडू आहेत जे दुखापतीने त्रस्त आहेत किंवा ते पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत. सर्वात मोठी समस्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेची आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघही अडचणीत आले आहेत. मात्र, भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर
विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ-
टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी आणि रॅसी व्हॅन डर डुसेन.
मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup 2023 double blow to south africa nortje and magala out of world cup due to injury avw