scorecardresearch

Premium

World Cup 2023: ऋषभ पंतची वर्ल्डकपमध्ये एन्ट्री! टीम इंडियाच्या खेळाडूंबरोबर करतोय मजामस्ती, पाहा Video

ICC World Cup: विश्वचषक सुरू होण्यापूर्वी संघाबाहेर असलेला भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंत आपल्या सहकारी खेळाडूंना वेगळ्या पद्धतीने प्रेरित करताना दिसला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

World Cup 2023: Rishabh Pant's entry in the World Cup Having fun with the players of Team India watch the video
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने अखेर विश्वचषकात प्रवेश केला आहे. सौजन्य- (ट्वीटर)

ICC World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने अखेर विश्वचषकात प्रवेश केला आहे. जरी पंत आयसीसी मेगा इव्हेंटमध्ये मैदानावर खेळाडूंना साथ देऊ शकणार नसला तरी, अलीकडे विश्वचषक मोहिमेपूर्वी पंत आपल्या सहकारी खेळाडूंना प्रेरित करताना दिसत आहे. क्रिकेट महाकुंभ सुरू होण्याच्या एक दिवस आधी बीसीसीआयने आपला एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यात तो विविध जाहिरातींमध्ये काम करताना दिसत आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऋषभ पंत कार अपघाताचा बळी ठरला होता. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे, परंतु आता तो पूर्णपणे निरोगी आणि बरा झाला आहे. पंत विश्वचषक सुरू होण्यापूर्वी ड्रीम ११च्या प्रोमो व्हिडीओमध्ये दिसला होता. या व्हिडीओमध्ये त्याच्याबरोबर यष्टीरक्षक इशान किशन आणि सलामीवीर फलंदाज शुबमन गिलही दिसत आहेत.

Asian Games: The path to medal is not easy for Bajrang Punia wrestling matches will start with Greco-Roman
Asian Games 2023: बजरंग पुनियासाठी पदकाचा मार्ग झाला खडतर, कुस्तीचे सामने ग्रीको-रोमन प्रकाराने होणार सुरू
Sanju Samson's post goes viral on social media due to his Dropped from Team India
IND vs AUS: “ते जे आहे ते आहे !! मी पुढे…”; टीम इंडियातून पुन्हा वगळल्याने संजू सॅमसनची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Team India video before final viral
Asia Cup 2023 Final: विराटसोबत सेल्फी काढण्यासाठी जमली गर्दी, शुबमन, इशान आणि सूर्याला चाहत्यांनी नाही दिला भाव, पाहा VIDEO
Rohit Sharma's Embarrassing Record
IND vs BAN: रोहित शर्माच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, आशिया कपमध्ये ‘हा’ नकोसा कारनामा करणारा ठरला पहिला भारतीय

बीसीसीआयने ट्वीटरवर एक प्रमोशनल व्हिडिओ जाहीर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो मेंढपाळाच्या म्हणजेच शेळीपाल्याच्या अवतारात दिसत आहे. पंतने टीम इंडियाची बस वाटेत थांबवली आणि शुबमन आणि इशानने त्याला कारण विचारले, “अरे रिशु, तू इथे का थांबलास, सराव मैदान अजून १५ किलोमीटर दूर आहे.” याला उत्तर देताना पंत म्हणतो, “भाऊ, वर्ल्ड कप आहे, थोड्या धावा कर, तुझा अतिरिक्त सराव होईल. GOAT (सर्वकालीन महान) बनायचे की नाही.” दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभला आजकाल संघासोबत अनेकदा पाहिले गेले आहे. आशिया चषकापूर्वीच तो संघाला भेटण्यासाठी एनसीएमध्ये पोहोचला होता. यानंतर तो विश्वचषकापूर्वीच खेळाडूंना प्रेरित करताना दिसतो. क्रिकेट चाहते ऋषभ पंतच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

रोहित शर्माचा सर्व संघांसाठी संदेश

रोहित शर्माने सर्व संघांच्या कर्णधारांना सांगितले, “येथे बसलेल्या सर्व कर्णधारांना आपल्या देशातील चाहत्यांना आनंद द्यायचा आहे. एकदिवसीय विश्वचषक जिंकणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मी सर्वांना एका गोष्टीची खात्री देतो की भारतातील लोक सर्व संघांवर प्रेम करतील आणि स्टेडियम खचाखच भरले जातील. भारतीय लोक क्रिकेट खेळावर खूप प्रेम करतात. तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही याची मला खात्री आहे.” ५ ऑक्टोबरपासून चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. तर १४ ऑक्टोबरला भारताचा पाकिस्तानशी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

हेही वाचा: World Cup 2023: ‘कॅप्टन डे’च्या आधी बाबर आझम रोहित शर्माला भेटला; म्हणाला, “मला घरापासून…”, Video व्हायरल

पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे

विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळणार असून गुरुवारपासून (५ ऑक्टोबर) सुरुवात होणार आहे. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World cup 2023 rishabh pants entry in the world cup motivating his fellow players video went viral avw

First published on: 04-10-2023 at 18:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×