Premium

IND vs AUS: “फक्त तोच संघ वर्ल्डकप जिंकेल जो…”, भारताच्या शानदार कामगिरीवर मायकेल वॉनचे आश्चर्यचकित करणारे विधान

India vs Australia 2nd ODI: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत टीम इंडियाची फलंदाजी पाहून मायकेल वॉनने मोठी भविष्यवाणी केली आहे. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-०अशी आघाडी घेतली आहे.

The one who defeats India will win World Cup former England legend Michael Vaughan predicted the World Cup 2023 winner
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत टीम इंडियाची फलंदाजी पाहून मायकेल वॉनने मोठी भविष्यवाणी केली आहे. सौजन्य- (ट्वीटर)

Michael Vaughan ODI World Cup 2023 prediction: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सध्याच्या एकदिवसीय मालिकेतील भारताची उत्कृष्ट कामगिरी पाहता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने मोठी भविष्यवाणी केली आहे. इंदोरमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या कामगिरीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना वॉनने एक दावा केला की, “भारताला पराभूत करणारा कोणताही संघ विश्वचषक जिंकेल.” भारतीय संघाच्या या अप्रतिम कामगिरीमुळे सध्या सगळ्याच संघांनी धसका घेतला आहे, असे या विधानातून दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मेन इन ब्लू’ संघाने रविवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ९९ धावांनी मानहानीकारक पराभव केला पण त्याच बरोबर आयसीसीच्या सर्वच क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. मायदेशातील प्रथम क्रमांकाचा संघ म्हणून आयसीसी स्पर्धेत टीम इंडिया प्रवेश करणार आहे. याआधी त्यांनी मोहालीतील पहिल्या वन डेत पाच गडी राखून विजय नोंदवला होता. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने दोन सामने जिंकत विजयी आघाडी घेतली आहे.

टीम इंडियाबाबत असे का म्हणाला मायकल वॉन?

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने रविवारी त्याच्या ट्वीटरवर पोस्ट करत भारताचे कौतुक केले. त्याने नुसते कौतुकच केले नाही तर असेही सांगितले की, केवळ भारताच्या या जबरदस्त खेळीचा दबावाचा ओझे हे आता इतर संघांवर असणार आहे. तसेच, भारतीय संघाला दबाव हे एकमेव कारण वर्ल्ड कपमध्ये प्रगती करण्यापासून रोखू शकतो.” तो पुढे म्हणाला, “माझ्यासाठी हे पूर्णपणे स्पष्ट आहे… जो कोणी भारताला हरवेल तो विश्वचषक जिंकेल… भारतीय खेळपट्ट्यांवर टीम इंडियाच्या फलंदाजीपुढे कोणाचाच निभाव लागू शकत नाही, तसेच त्यांच्याकडे गोलंदाजीचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. फक्त त्यांना जर कोणी हरवू शकत असेल तर ते एकमेव कारण म्हणजे दबाव आहे.”

हेही वाचा: World Cup 2023: टीम इंडियाला मोठा धक्का! वर्ल्डकप २०२३ मधून ‘हा’ खेळाडू होऊ शकतो बाहेर, BCCIने दिले संकेत

सामन्यात काय झाले?

इंदोरमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताने ८ धावांवर ऋतुराज गायकवाडची विकेट गमावली. मात्र, शुबमन गिल (९७ चेंडूत १०४ धावा) आणि श्रेयस अय्यर (९० चेंडूत १०५ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी करत ‘मेन इन ब्लू’ला भक्कम धावसंख्येकडे नेले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने ३७ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. त्याने त्याचा मुंबई इंडियन्सचा सहकारी कॅमेरॉन ग्रीनने सलग चार षटकार ठोकले. दुसरीकडे, कर्णधार के.एल. राहुलने ३८ चेंडूत ५२ धावा केल्या. पाऊस पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाला ३३ षटकात ३१७ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. त्यांचा डाव २८.२ षटकात २१७ धावांवर आटोपला. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World cup 2023 the team which defeats india will win the world cup big statement from england former captain michael vaughan avw

First published on: 25-09-2023 at 20:21 IST
Next Story
World Cup 2023: टीम इंडियाला मोठा धक्का! वर्ल्डकप २०२३ मधून ‘हा’ खेळाडू होऊ शकतो बाहेर, BCCIने दिले संकेत