ICC Cricket World Cup 2023: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी ८ संघ आपोआप पात्र होणार होते. यापैकी ७ संघांची घोषणा करण्यात आली होती, परंतु आयर्लंड आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणार्‍या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने ८वा संघ निश्चित करण्यात आला. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात खेळल्या जाणाऱ्या मेगा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. आता, जे आठ संघ आपोआप पात्र होणार होते ते मुख्य विश्वचषकात दाखल झाले आहेत. त्याचवेळी, दोन संघ पात्रता फेरीद्वारे स्पर्धेसाठी पात्र ठरतील. त्यात दोन्ही संघ माझी विश्वविजेते असून वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांना पात्रता फेरी खेळून यावे लागणार आहे.

या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारताने आयोजित केल्या जाणाऱ्या आयसीसी विश्वचषक २०२३ साठी थेट पात्रता मिळवलेल्या आठ संघांची नावे मंगळवारी रात्री उशिरा निश्चित करण्यात आली. यजमान भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांना या स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्यात यश आले आहे. १९७५ आणि १९७९चे चॅम्पियन वेस्ट इंडिज यावेळीही थेट पात्र ठरू शकले नाहीत. त्याच वेळी, १९९६चा विजेता आणि चार वेळा उपविजेता श्रीलंकाही थेट पात्र ठरू शकला नाही, ही दोन्ही संघांसाठी खूप मोठी नामुष्की ठरली आहे.

Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने
Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा
Sunil Chhetri
भारताचे विजयाचे लक्ष्य! अफगाणिस्तानविरुद्ध ‘फिफा’ विश्वचषक पात्रता सामना आज; छेत्रीकडून अपेक्षा

हेही वाचा: IPL2023: नेहल वढेराचा एकच शॉट अन कारला पडला खड्डा, TATAला पाच लाखांचा भुर्दंड; पाहा Video

पावसाने आयर्लंडच्या थेट पात्र होण्याच्या आशा धुळीस मिळवल्या

मंगळवारी चेम्सफोर्ड येथे बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यातील एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला त्यामुळे आयर्लंडच्या स्पर्धेसाठी थेट पात्र होण्याच्या आशा धुळीस मिळाल्या. अशा स्थितीत टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघाला या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला.

क्रिकेट विश्वचषक सुपर लीगची सुरुवात आयसीसीने १० संघांच्या स्पर्धेसाठी केली होती. या लीग अंतर्गत, गुणतालिकेत अव्वल ८ मध्ये स्थान मिळवणारेच संघ थेट स्पर्धेसाठी पात्र ठरले. आतापर्यंत ७ संघ निश्चित झाले होते आणि आठव्या संघाचे भवितव्य आयर्लंड विरुद्ध बांगलादेश वनडे मालिकेवर अवलंबून होते. जर आयर्लंडने मालिकेतील तीनही सामने जिंकले असते, तर आयर्लंड हा स्पर्धेसाठी आपोआप पात्रता मिळवणारा आठवा संघ ठरला असता, परंतु दक्षिण आफ्रिकेने जर एकही सामना गमावला असता तर त्यांना ही संधी मिळाली नसती आणि तेच झालं.

हेही वाचा: IPL Playoffs 2023: मुंबई इंडियन्सकडून पराभूत होऊनही RCB पोहोचू शकते प्लेऑफमध्ये, तीन संघांमध्ये होणार चुरस, जाणून घ्या संपूर्ण समीकरण

अशा परिस्थितीत आता श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि आयर्लंड आणि झिम्बाब्वे सारख्या कसोटी खेळणाऱ्या देशांना जूनमध्ये झिम्बाब्वे येथे होणाऱ्या विश्वचषक पात्रता स्पर्धेद्वारे तिकीट मिळवावे लागणार आहे. या चार संघांशिवाय नेदरलँड, स्कॉटलंड, ओमान, नेपाळ, अमेरिका आणि युएई हे संघही पात्रता फेरीत आपले नशीब आजमावतील आणि विश्वचषकाचे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतील. विश्वचषकादरम्यान, १० संघ एकमेकांशी राऊंड रॉबिनच्या आधारावर सामने खेळतील. यानंतर अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.