Team India ICC World cup 2023 Semi Final scenario Marathi News : भारतीय संघाची विश्वचषक स्पर्धा २०२३ मध्ये विजयी घोडदौड सुरू आहे. टीम इडियाने या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या सर्व सहा पैकी सहा सामने जिंकले आहेत. भारतासह गुणतालिकेतील पहिल्या सात संघांचा उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. गुणतालिकेतील शेवटच्या तीन संघांना आता स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागणार आहे. यंदाच्या स्पर्धेत अफगानिस्तान आणि नेदरलँड्स या संघांनी बलाढ्य संघांना पराभवाची धूळ चाखायला लावून क्रिकेटरसिकांना मोठा धक्का दिला आहे. अफगानिस्तानचं या स्पर्धेतलं आव्हान जिवंत आहे.

टीम इंडियाने स्पर्धेत आतापर्यंत सहा पैकी सहा सामने जिंकले आहेत. तरी रोहित शर्मा आणि कंपनीला अद्याप उपांत्य फेरीचं तिकीट मिळालेलं नाही. गुणतालिकेत पहिल्या स्थानी असून, नेट रनरेट उत्तम असूनही भारताला अद्याप उपांत्य फेरीचं तिकीट का मिळालं नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला तर मग उपांत्य फेरीचं समीकरण समजून घेऊया.

loksatta analysis gautam gambhir s appointment as head coach of team india even though he has no experience
रोखठोक, स्पष्टवक्ता गौतम गंभीर भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणार? प्रशिक्षकपदाचा अनुभव नसतानाही नियुक्तीमागे काय कारणे?
Twenty20 World Cup winning Indian team welcomed in Mumbai
ट्वेन्टी२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे दिमाखात स्वागत
ICC Announced team of the tournament
ICC ने T20 WC नंतर जाहीर केली ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’, भारताचे तब्बल ६ खेळाडू, मात्र या दिग्गजाचं नाव नाही
Three important turning points in India's victory
IND vs ENG : रोहित-सूर्याची फलंदाजी, अक्षर-कुलदीपची फिरकी, ‘या’ तीन टर्निंग पॉइंट्समुळे भारताने इंग्लंडवर केली मात
T20 World Cup 2024 India vs England Semi Final 2 Match Preview in Marathi
IND vs ENG Semi Final 2 : पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणत्या संघाला होणार फायदा?
India vs England T20 World Cup 2024 Semi Final
ट्वेन्टी २० विश्वचषक क्रिकेट: उपांत्य फेरीत भारताची आज गतविजेत्या इंग्लंडशी गाठ,परतफेड करण्यास सज्ज!
T20 World Cup 2024 Semi Final Schedule in Marathi
T20 WC 2024 मधील टॉप ४ संघ ठरले, उपांत्य फेरीचे सामने कधी, कुठे आणि केव्हा खेळवले जाणार? पाहा वेळापत्रक
India Vs Bangladesh Weather Report
IND vs BAN : भारतासाठी विजय आवश्यक, पावसामुळे सामना रद्द झाला किंवा हरला तर काय होणार? जाणून घ्या समीकरण

विश्वचषक स्पर्धेत लिंबू-टिंबू म्हटल्या जाणाऱ्या संघांनी अनेक बलाढ्य संघांना जोरदार दणका दिला आहे. तसेच स्पर्धेत इथून पुढे खेळवले जाणारे सामने उपांत्य फेरीसाठी महत्त्वाचे असणार आहेत. गुणतालिकेतले पहिले सात संघ नॉकआऊट स्थितीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीत नेट रनरेटच्या समीकरणाशिवाय आपलं स्थान सुरक्षित करण्यासाठी कुठल्याही संघाला १४ गुणांची आवश्यकता आहे. टीम इंडिया अद्याप १२ गुणांवर आहे. गुणतालिकेची सध्याची परिस्थिती पाहता किमान दोन संघ १२ गुणांसह बाद फेरीत पोहोचणार आहेत. तर दोन संघ १४ किंवा त्याहून अधिक गुणांसह बाद फेरीत दाखल होतील.

हे ही वाचा >> World Cup 2023: टीम इंडिया मुंबईत पोहोचताच रोहित शर्माची चिंता वाढली, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर

उपांत्य फेरीत चार संघ पोहोचणार आहेत. या चार जागांसाठी भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया हे चार संघ प्रबळ दावेदार आहेत. तरी अद्याप अफगानिस्तानचं आव्हान जिवंत आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा खूपच कमी आहेत. तर इंग्लंड आणि बांगलादेशचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. टीम इंडियाने उर्वरित तीन सामन्यांपैकी एक सामना जिंकला तरी रोहित आणि कंपनीला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे.