ग्वांगजू (दक्षिण कोरिया) : भारतीय पुरुष कंपाऊंड तिरंदाजी संघाने शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात पिछाडीवरून पुनरागमन करत फ्रान्सला दोन गुणांनी पराभूत करत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळवले, तर मोहन भारद्वाजने वैयक्तिक रौप्यपदक मिळवले. विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील भारताची एकूण पदकसंख्या पाच झाली आहे. अभिषेक वर्मा, अमन सैनी आणि रजत चौहानचा समावेश असलेल्या पुरुष कंपाऊंड संघाने जोरदार पुनरागमन करून फ्रान्सला २३२-२३० असे नमवत सुवर्णपदक मिळवले. मग कंपाऊंड तिरंदाज अभिषेक वर्माने अवनीत कौरच्या साथीने भारताला दुसरे पदक मिळवून दिले. भारतीय जोडीने मिश्र सांघिक गटात तुर्कीच्या अमीरकान हाने आणि आयसे बेरा सुजेर जोडीला १५६-१५५ असे नमवत कांस्यपदक मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup archery tournament phase ii gold medal for indian men compound team ysh
First published on: 22-05-2022 at 01:04 IST