scorecardresearch

FIFA World Cup 2022: अमेरिका इंग्लंडविरुद्ध अपराजितच!

अमेरिकेच्या संघाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धामध्ये बलाढय़ इंग्लंडला रोखण्याची प्रथा यंदाही कायम राखली.

FIFA World Cup 2022: अमेरिका इंग्लंडविरुद्ध अपराजितच!

अल रायन : अमेरिकेच्या संघाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धामध्ये बलाढय़ इंग्लंडला रोखण्याची प्रथा यंदाही कायम राखली. शनिवारी मध्यरात्री झालेला अमेरिका-इंग्लंड सामना गोलशून्य बरोबरीत संपला. दोन्ही संघांकडून गोल करण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण त्यांना गोलचे खाते अखेपर्यंत उघडता नाही. 

अमेरिकेकडून आघाडीपटू ख्रिस्टियन पुलिसिक आणि वेस्टन मॅकेनी यांनी गोल करण्याचे चांगले प्रयत्न केले. मात्र, त्यांना गोल करण्यात यश आले नाही. दोघांनीही मारलेले फटके गोलपोस्टला धडकून बाहेर गेले. या निकालाचे वैशिष्टय़ म्हणजे इंग्लंडला विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एकदा अमेरिकेवर विजय मिळविण्यात अपयश आले. यापूर्वी उभय संघांमध्ये झालेले विश्वचषकातील दोनही सामने अमेरिकेने जिंकले होते.  

अमेरिकेच्या खेळाडूंना फ्री-किक, कॉर्नर किकवर अपेक्षित यश साधता आले नाही. मंगळवारी इराणविरुद्ध खेळताना त्यांना या आघाडीवर सुधारणा करावी लागेल. गोलरक्षक मॅट टर्नर, बचावपटू टीम रिम, कर्णधार टायलर अ‍ॅडम्स यांनी अप्रतिम खेळ करून इंग्लंडने केलेली आक्रमणे परतवून लावली. इंग्लंडकडून आक्रमणात कर्णधार हॅरी केन, रहीम स्टर्लिग यांनी निराशा केली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या