टोरांटो : कॅनडाने जमैकाला ४-० असे पराभूत करत तब्बल ३६ वर्षांनंतर ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत स्थान मिळवले.
कॅनडाने १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्याआधी किंवा नंतर त्यांना या स्पर्धेसाठी पात्र ठरता आले नव्हते. यंदा मात्र त्यांनी पात्रता फेरीत अप्रतिम कामगिरी केली. ‘‘आम्ही सर्व विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न पाहत होतो. आज आमचे स्वप्न पूर्ण झाले आहे. हा अनुभव अविश्वसनीय आहे,’’ असे मध्यरक्षक जोनाथन ओसोरियो म्हणाला.
विश्वचषक पात्रता फेरीच्या या सामन्यात कॅनडाकडून कायले लारिन (१३वे मिनिट), टाजोन बुकानन (४४वे मि.), ज्युनियर होइलेट (८२वे मि.) आणि अॅड्रियन मारियापा (८८ वे मि., स्वयंगोल) यांनी गोल झळकावले.
अमेरिकेचा विजय
ओरलँडो : कर्णधार ख्रिस्टियन पुलिसिकने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये नोंदवलेल्या पहिल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर अमेरिकेने विश्वचषक पात्रतेच्या सामन्यात पनामावर ५-१ असा विजय मिळवला. ते विश्वचषक पात्रतेच्या उंबरठय़ावर आहेत.