विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरी : रोनाल्डोच्या विक्रमी हॅट्ट्रिकमुळे पोर्तुगालचा दिमाखदार विजय

रोनाल्डोने संघाचा पाचवा गोल करताना वैयक्तिक हॅट्ट्रिक पूर्ण केली.

पॅरिस : कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकमुळे पोर्तुगालने विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीच्या लढतीत लक्झेम्बर्गचा ५-० असा धुव्वा उडवला. रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक (१०) हॅट्ट्रिकचा विक्रम आपल्या नावे केला. या सामन्यात आठव्या आणि १३व्या मिनिटाला पोर्तुगालला पेनल्टी मिळाली. दोन्ही वेळा रोनाल्डोने चेंडू यशस्वीरीत्या गोलजाळ्यात धाडला. १७व्या मिनिटाला त्याचा मँचेस्टर युनायटेड संघातील सहकारी ब्रुनो फर्नाडेझने गोल केल्याने मध्यंतराला पोर्तुगालकडे ३-० अशी आघाडी होती. उत्तरार्धात जाओ पालहिन्हाने चौथ्या गोलची भर घातली. त्यानंतर रोनाल्डोने संघाचा पाचवा गोल करताना वैयक्तिक हॅट्ट्रिक पूर्ण केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: World cup qualifiers ronaldo s hat trick gives portugal convincing victory zws