scorecardresearch

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : भारताला सांघिक प्रकारात सुवर्ण

महिला त्रिकुटाने १६ अचूक लक्ष्यवेध करताना भारताच्या खात्यावर दुसरे सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक जमा केले.

कैरो : श्री निवेता, ईशा सिंग आणि रुचिता विनेरकर या भारताच्या महिला त्रिकुटाने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

महिला त्रिकुटाने १६ अचूक लक्ष्यवेध करताना भारताच्या खात्यावर दुसरे सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक जमा केले. दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदकासह भारतीय संघ गुणतालिकेत आघाडीवर आहे. जर्मनीने रौप्यपदक पटकावले.

भारतीय महिला त्रिकुटाने पात्रतेच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ५७४ गुणांसह आघाडीचे स्थान मिळवले, तर जर्मनीच्या त्रिकुटाने ५७१ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. ईश, श्री निवेता आणि रुचिता या तिघींनी पात्रतेच्या पहिल्या टप्प्यातही पहिले स्थान काबीज केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World cup shooting competition india won gold in the team event akp

ताज्या बातम्या