Sri Lanka World Cup Squad: श्रीलंकेने भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जखमी महिश तिक्षणा आणि दिलशान मदुशंका यांची निवड करण्यात आली आहे. तिन्ही खेळाडू अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत. असे असूनही त्याला स्थान मिळाले आहे. दासुन शनाका विश्वचषकात संघाचे नेतृत्व करणार आहे. कुसल मेंडिसकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयसीसी आणि श्रीलंका क्रिकेटने याची अधिकृत घोषणा केलेली आहे. रिपोर्टनुसार, श्रीलंकेने दुशान हेमंथा आणि चमिका करुणारत्ने यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली आहे. हसरंगा, तिक्षना आणि मदुशंका तंदुरुस्त असतील तरच खेळू शकतील, असे श्रीलंकेच्या बोर्डाने सांगितले. अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजची निवड करण्यात आलेली नाही. या ३६ वर्षीय खेळाडूने विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेसाठी २२ सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने ५३३ धावा केल्या. मॅथ्यूजला दुसऱ्या विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नाही. हेही वाचा: Asian Games 2023: देशासाठी पहिले पदक जिंकणाऱ्या रमिताने सांगितले तिच्या यशामागील गुपित; म्हणाली, “नियमित आहार उपयोगाचा नसतो…” वानिंदू हसरंगा विश्वचषक संघाचा भाग नाही. अलीकडेच लंका प्रीमियर लीग (LPL) दरम्यान अष्टपैलू वानिंदू हसरंगा जखमी झाला. याच कारणामुळे तो अंतिम सामना खेळू शकला नाही. मात्र, असे असतानाही वानिंदू हसरंगा याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. वास्तविक, वानिंदू हसरंगा हा लंका प्रीमियर लीगमधील बी-लव्ह कँडी संघाचा कर्णधार होता. बी-लव्ह कॅंडी संघाने लंका प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले. मात्र, वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे विजेतेपदाचा सामना खेळू शकला नाही. त्याचवेळी वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे आशिया कपमध्ये खेळू शकला नाही. पण हसरंगा वर्ल्डपर्यंत वानिंदू फिट असेल असा विश्वास होता. मात्र, विश्वचषक संघात वानिंदू हसरंगाची अनुपस्थिती हा श्रीलंकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. हेही वाचा: AB de Villiers: वर्ल्डकपनंतर विराट कोहली वन डे आणि टी२० मधून निवृत्ती घेणार? एबी डिव्हिलियर्सने केला मोठा दावा श्रीलंकेचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेचा संघ भारताविरुद्ध पराभूत झाला होता. विजेतेपदाच्या लढतीत ती ५० धावांत ऑलआऊट झाली. भारताने हा सामना १० विकेटने जिंकला होता. लंकेचा संघ विश्वचषकातील पहिला सामना ७ ऑक्टोबर रोजी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर १० ऑक्टोबरला पाकिस्तानशी सामना होणार आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्सीय संघ श्रीलंकेचा संघ: दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुसल परेरा, पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथा, महेश तिक्षणा, दुनिथ वेल्लालागे, कसून राजिथा, मथिश पाथिराना, लाहिरू कुमारा आणि दिलशान मदुशंका राखीव खेळाडू: चमिका करुणारत्ने.