World Team TT Championships: Indian team gets off to a winning start as Sathian defeats Uzbekistan in World Table Tennis Championships avw 92 | Loksatta

World Team TT Championships: जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सुरुवात, पुरुष संघाने केला उझबेकिस्तानचा पराभव

चीनमध्ये सुरु झालेल्या जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष सांघिक प्रकारात संघाने सलामीच्या सामन्यात उझबेकिस्तानचा पराभव केला.

World Team TT Championships: जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सुरुवात, पुरुष संघाने केला उझबेकिस्तानचा पराभव
संग्रहित छायाचित्र ( इंडियन एक्सप्रेस)

चीनमध्ये सुरु झालेल्या जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष सांघिक प्रकारात संघाने सलामीच्या सामन्यात उझबेकिस्तानचा पराभव केला. चीनमध्ये सुरूवात झालेल्या जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये शनिवारी दुसऱ्या गटातील पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानवर विजय मिळवून भारतीय पुरुष संघाने मोहिमेची सुरुवात केली.

भारतीय संघाने त्यांचे प्रतिस्पर्धी उझबेकिस्तानचा धुव्वा उडवत सामन्यात ३-० असा निर्भेळ यश संपादन केले. भारतासाठी, पहिल्या सेटमध्ये हरमीत देसाईने सुरुवात केली. त्याचा प्रतिस्पर्धी एलमुरोड खोलिकोव्ह होता. देसाईने त्याच्या विरोधात चांगला खेळ करत पहिला सेट ११-९ असा जिंकला. देसाईने दोन गुणांच्या फरकाने सेटमध्ये विजय मिळवत आपल्या नावावर केला. सलग तीन सेटमध्ये भारतीय संघाने उझबेकिस्तानच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले, शेवटच्या सेटमध्ये तर देसाईने त्याला फक्त एक गुण मिळवण्याची संधी दिली आणि तब्बल ११-१ अशा फरकाने सांघिक कामगिरीतील पहिला फेरी ३-० अशी जिंकली. त्यामुळे या सांघिक सामन्यातील पहिल्या फेरीत भारताने १-० अशी आघाडी घेतली.

हेही वाचा   : विश्लेषण: आधी जडेजा, आता बुमरा! भारतीय क्रिकेटपटूंच्या दुखापतींच्या सत्राला जबाबदार कोण?  

राष्ट्रकुल क्रीडा २०२२ चा पदक विजेता साथियान गणसेकरन दुसऱ्या फेरीत भारतासाठी खेळणार होता, अनोर्बोएव अब्दुलअजीझ त्याच्याशी सामना करणार होता. गणसेकरनने त्याच्या विरोधात शानदार सुरुवात केली. भारताच्या सर्वोच्च मानांकित टेबल टेनिस स्टारने पहिल्या सेटमध्ये एनोरबोएवचा ११-३ असा पराभव केला. पुढच्या सेटमध्ये अॅनोरबोएव्हला त्याच्या बाजूने काही गुण मिळाले, परंतु स्कोअरलाइन अजूनही ११-६ अशी भारताच्या बाजूने होती. अंतिम सेटमध्ये उझबेकिस्तानची गणसेकरनबरोबर मात्र चुरशीची लढत झाली होती.  कारण तेवढा फरक हा जिंकण्यासाठी पुरेसा दिसत नव्हता. परंतु, गणसेकरनने शेवटी तो सेट ११-९ ने जिंकला. त्याच्या या खेळीने भारतीय संघाने सांघिक कामगिरीतील दुसरी फेरी जिंकत २-० अशी आघाडी घेतली.

हेही वाचा   :  राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : रुद्रांक्ष पाटीलचा सुवर्णवेध; स्केटिंगमध्ये सिद्धांत कांबळेची सोनेरी कामगिरी 

सामन्यातील दोन्ही फेरीत भारतीय संघाने विजय मिळवल्याने या फेरीत उझबेकिस्तानला विजय मिळवणे अत्यंत आवश्यक झाले. नाहीतर पाच फेरींच्या सामन्यात त्यांचा याच फेरीत आव्हान संपुष्टात आले असते. मानव ठक्कर हा भारतासाठी तिसरा सेट खेळण्यासाठी मैदानात उतरला, त्याचा सामना हा प्रतिस्पर्धी इस्कंदारोव शोखरुख होता.

शोखरुखने भारतीय संघाला कडवी झुंज दिली, त्यामुळे त्याला गुणांसाठी झटावे लागले. मात्र, २२ वर्षीय ठक्करने संयम राखत पहिला सेट ११-८ असा जिंकला. ठक्करने खडतर पण अनुकूल पहिल्या सेटनंतर मिळालेला वेग कायम ठेवला आणि पुढील दोन सेट प्रत्येकी ११-५ ने जिंकले. ठक्करने तिसरी फेरी ३-० ने जिंकताच भारतीय संघाने टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतील पहिला सामना ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण: आधी जडेजा, आता बुमरा! भारतीय क्रिकेटपटूंच्या दुखापतींच्या सत्राला जबाबदार कोण?

संबंधित बातम्या

सलामीला शिखर धवन की केएल राहुल?
अपराजित्व राखण्यात ब्राझील अपयशी; सर्बियाचा बचाव भेदत स्वित्झर्लंड बाद फेरीत
अमेरिकेला नमवत नेदरलँड्स उपांत्यपूर्व फेरीत
“तो खेळाडू भारताला विश्वचषक जिंकवून देईल” ब्रेट ली म्हणाला, “रोहित, द्रविडने फक्त….”
IND vs BAN: ‘त्यांच्याविरुद्ध जिंकण्यासाठी आम्हाला…’; सामन्याआधी रोहित शर्माचे संघासाठी सूचक वक्तव्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
गोपीनाथ मुंडेंविषयी सुषमा अंधारेंचे मोठे विधान, नितीन गडकरींचे नाव घेत म्हणाल्या…
आधी स्वतःबद्दल भरभरून बोलली, नंतर ढसाढसा रडली, मलायकाबरोबर नेमकं काय घडलं?
यशस्विनी : ‘ती’ उगवत्या सूर्याच्या देशात! (पूर्वार्ध)
अपत्य नियंत्रणाची शिफारस; समान नागरी कायद्यासाठी उत्तराखंड सरकारच्या समितीचा अहवाल
मुंबई: कडेकोट सागरी सुरक्षेचा नौदलाचा संकल्प; श्रीवर्धन-हरिहरेश्वर किनाऱ्यावरील बोटीमुळे सुरक्षेतील त्रुटी उघड