World Test Championship :अरुंडेल (ससेक्स) : जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ टप्प्याटप्प्याने इंग्लंडमध्ये दाखल झाला असून, सोमवारी विराट कोहलीने भारतीय संघासोबत सराव केला. खांद्याच्या दुखापतीतून बरा झालेल्या जयदेव उनाडकटनेही सरावात सहभाग घेतला.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत संघांदरम्यान ७ ते ११ जूनदरम्यान ओव्हल येथे होणार आहे. या सामन्यासाठी ‘आयपीएल’मधून आटोपते घेत भारतीय खेळाडू टप्प्याटप्प्याने इंग्लंडला दाखल झाले आहेत. कर्णधार रोहित शर्मा यशस्वी जैस्वालसह सोमवारी येथे दाखल झाला. मात्र, तो मंगळवारपासून सरावात सहभागी होईल. उमेश यादव
विराट कोहली, उमेश यादव, मोहम्मद सिराज, फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट
‘आयपीएल’ची अंतिम लढत पावसामुळे पुढे ढकलली गेल्याने रवींद्र जडेजा, शुभमन गिल, मोहम्मद शमी, के.एस. भरत, अजिंक्य रहाणे
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.