Team India World Test Championship Points table: भारत- श्रीलंका कसोटी मालिकेचा शेवट असा होईल, असा कोणा विचारही केला नसेल. भारतीय संघाने पहिल्या डावात ५०० धावांचा डोंगर उभारला त्यानंतर श्रीलंकेला फॉलोऑनही दिला. यावरुन असं वाटत होतं की, भारतीय संघ हा सामना सहज जिंकणार. पण श्रीलंकेचा युवा फलंदाज सोनल दिनुशाने दोन्ही डावात शतकं झळकावली सामना बरोबरीत आणला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्याची सोपी संधी होती. पण सामना बरोबरीत राहिल्याने, भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे.

हा सामना सुरू होण्याआधीही भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी होता. भारतीय संघाचे गुण ६४ तर विजयाची सरासरी ५३.३३ इतकी होती. आता श्रीलंकेविरुद्धचा सामना बरोबरीत सुटल्याने भारतीय संघाचे गुण ६८ झाले आहेत. तर विजयाची सरासरी ही ५१.५२ वर घसरली आहे. तर श्रीलंकेचा संघ देखील सहाव्या स्थानी कायम आहे. या सामन्याआधी श्रीलंकेचे २० गुण होते. तर विजयाची सरासरी ३३.३३ इतकी होती. आता सामना बरोबरीत सुटल्यानंतर गुण २८ तर विजयाची सरासरी ३३.३३ इतकीच आहे. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय होता. कारण हा सामना जिंकून भारतीय संघाकडे गुणतालिकेत चौथ्या स्थानी जाण्याची संधी होती. पण श्रीलंकेने तोंडचा घास पळवल्याने भारतीय संघाला पाचव्या स्थानी समाधान मानावं लागणार आहे.

भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाकडे गुणतालिकेत वर जाण्याची संधी होती. पण सोनल दिनुशाने भारतीय संघाच्या विजयासमोर खंबीरपणे उभा राहिला. त्यामुळे ही संधी थोडक्यात हुकली आहे. इथून पुढे भारतीय संघ न्यूझीलंडला जाऊन न्यूझीलंडचा सामना करणार आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाला ७ सामने खेळायचे आहेत. जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर भारतीय संघाला या ७ पैकी ६ सामने तरी जिंकावे लागणार आहेत.

भारत- श्रीलंका सामना ड्रॉ

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५०३ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या २९० धावांवर आटोपला. त्यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेला फॉलोऑन दिला. पण भारतीय संघाचा हा निर्णय चुकला. कारण, श्रीलंकेकडून सोनम दिनुशाने दमदार शतक झळकावलं आणि ९ गडी बाद ४२९ धावांचा डोंगर उभारला. शेवटी हा सामना ड्रॉ करण्याचा निर्णय घेण्यात आला.