कोल्हापूर : टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत – पाकिस्तान यांच्यात सामना व्हायला हरकत नाही. खेळाकडे खेळ म्हणून पाहिले पाहिजे. त्याला वादात अडकवणे योग्य ठरणार नाही, असे मत माजी कसोटीपटू, पद्मश्री सय्यद किरमाणी यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सुरू असलेल्या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना होऊ नये अशी मागणी होत आहे. याकडे लक्ष वेधले असता राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष किरमाणी म्हणाले, वास्तविक पाहता भारत-पाकिस्तान या दोन्ही संघातील खेळाडूंचे संबंध स्नेहाचे राहिले आहेत. या दोन्ही संघातीलच नव्हे तर कोणत्याही संघाने मैदानावर उतरल्यावर निखळ व्यावसायिक भूमिका निभावली पाहिजे. इंग्लंड – ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍसेस कसोटी मालिकेत कडवी झुंज दिसून येते. त्याप्रमाणेच भारत-पाकिस्तान यांच्यात सामन्यावेळी संघर्ष जरूर आहे. खेळ हा शांतता प्रस्थापित करण्याचा भाग आहे. खेळाडूंमध्ये ही हीच भावना आहे. हा विषय सोडून अन्य विचार केला जाऊ नये, असे ते म्हणाले.भारताकडे जेतेपदविश्वचषकातील चार सर्वोत्तम संघामध्ये भारताचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व  इंग्लंड यांच्यापेक्षा सरस कामगिरी करून यापूर्वी विश्वचषक जिंकणारा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत नक्की विजेतेपद नक्की पटकावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World winning cricketer syed kirmani strong opinion on india pakistan match srk
First published on: 22-10-2021 at 19:16 IST