विश्व हॉकी लीग स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघ न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या हॉवकेज बे चषक स्पध्रेसाठी सज्ज झाला आहे. भारताची सलामीची लढत शनिवारी चीनशी होणार आहे.
२०१४ साली झालेल्या आशिया स्पर्धेमध्ये भारत-चीनमध्ये अखेरची लढत झाली होती. या सामन्यामध्ये चीनने भारताला २-१ अशा फरकाने पराभूत केले होते. पण विश्व हॉकी लीगमधील विजयानंतर भारतीय संघाचे मनोबल उंचावले असून या सामन्यात त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.