scorecardresearch

WPL 2023 Final MI vs DC: महिला प्रीमियर लीगचा समारोप सोहळा होणार भव्य, कोण करणार परफॉर्म्स घ्या जाणून

WPL 2023 Final MI vs DC: महिला प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी समारोप समारंभ पार पडणार आहे.

WPL 2023 Final MI vs DC Updates
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (फोटो-ट्विटर)

WPL 2023 Final MI vs DC Closing Ceremony: महिला प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या ऐतिहासिक स्पर्धेतील हा शेवटचा सामना असेल, त्यामुळे तो खास बनवण्यासाठी सामन्यापूर्वी समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारोप समारंभाला संध्याकाळी सहा वाजता सुरुवात होईल.

सामन्यापूर्वी महिला प्रीमियर लीगचा समारोप सोहळा ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. यामध्ये अनेक कलाकार परफॉर्म करणार आहेत. समारोप समारंभ सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू होऊ शकतो. इनसाइड स्पोर्टच्या रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोण तमन्ना भाटियासारख्या प्रसिद्ध अभिनेत्री यात परफॉर्म करण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. कोणतीही महिला गायिका येथे तिच्या अभिनयाने थैमान घालू शकते. लवकरच त्याची घोषणा होऊ शकते.

दिल्ली कॅपिटल्सने ग्रुप स्टेजमध्ये चमकदार कामगिरी केली आणि पॉइंट टेबलवर पहिले स्थान पटकावले, त्यामुळे थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. दिल्लीने ८ पैकी ६ सामने जिंकले तर २ हरले. मुंबई इंडियन्सने ग्रुप स्टेजमधील ८ पैकी ६ सामने जिंकले आणि २ गमावले, परंतु त्यांचा नेट रनरेट दिल्लीपेक्षा कमी होता. एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपीचा ७२ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

WPL 2023 समापन समारंभाचे लाइव्ह स्ट्रिमिंग टीव्हीवर कसे पाहावे?

महिला प्रीमियर लीग २०२३ चा समारोप समारंभ संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल. तुम्ही स्पोर्ट्स १८ चॅनलवर टीव्हीवर लाइव्ह पाहू शकता.
मोबाईलवर लाइव्ह कसे बघायचे? महिला प्रीमियर लीग २०२३ चा समारोप समारंभ संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल. तुम्ही स्पोर्ट्स १८ चॅनलवर टीव्हीवर लाइव्ह पाहू शकता.

हेही वाचा – IPL मध्ये भोपळाही फोडला नाही! १४ वेळा शून्यावर झाले बाद; ‘या’ दोन दिग्गज फलंदाजांच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

दोन्ही संघांचे स्कॉड –

दिल्ली कॅपिटल्स संघ: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, एलिस कॅप्स, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तान्या भाटिया (यष्टीरक्षक), राधा यादव, शिखा पांडे, पूनम यादव, जसिया अख्तर, लॉरा हॅरिस, तारा नॉरिस, मिन्नू मणी, अपर्णा मंडल, टीटा साधू, स्नेहा दीप्ती

मुंबई इंडियन्स संघ: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता, सायका इशाक, हीदर ग्रॅहम, क्लोए ट्रायटन धारा गुर्जर, सोनम यादव, नीलम बिश्त, प्रियांका बाला

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 13:06 IST

संबंधित बातम्या