scorecardresearch

WPL 2023, MIW vs DCW Highlights: हरमन-ब्रंटची तुफानी खेळी! MI ब्रिगेडने दिल्ली केली सर, सात विकेट्सने मात करत पटकावले विजेतेपद

Mumbai Indians Women vs Delhi Capitals Women Final Highlights Match Updates: सलग तीन आठवड्यांपासून सुरु असणारी महिला प्रीमिअर लीगचे आज समारोप झाला असून मुंबई इंडियन्सने आम्हीच खरे विजयाचे दावेदार होतो हे सिद्ध केले. दिल्लीवर आठ गडी राखून wpl ट्रॉफीवर नाव कोरले.

WPL 2023 Final Highlights MI-W vs DC-W Match Updates
मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध दिल्ली कॅपिटल महिला अंतिम सामना हायलाइट्स

WPL 2023 Final Highlights Updates, MI-W vs DC-W: महिला प्रीमियर लीगचा उद्घाटन हंगाम आज संपत आहे. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सात गडी राखून पराभव केला. हरनप्रीत कौरच्या संघाने पहिल्या सत्राचे विजेतेपद पटकावत आश्चर्यकारक कामगिरी केली. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने २० षटकांत नऊ गडी गमावून १३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने १९.३ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावा करून सामना जिंकला.

मुंबईची झुंजार खेळी

मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात खास ठरली नाही. मात्र, नंतर मुंबईची गाडी रुळावर आली. मुंबईला पहिले दोन धक्के यास्तिका भाटिया (४धावा) आणि आणि हेली मॅथ्यूज (१३धावा) यांच्या रूपात अनुक्रमे १३ आणि २३ धावसंख्येवर बसले. त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि नॅटली सिव्हर-ब्रंट यांनी डाव सांभाळला. त्यांच्यात ७२ धावांची भागीदारी झाली. यावेळी हरमनप्रीत ३७ धावांवर बाद झाली. मात्र, ब्रंटने शेवटपर्यंत झुंज दिली.

शिखा आणि राधाची खेळी व्यर्थ

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नाही. संपूर्ण नाणेफेक चेंडूवर संघाने पहिले तीन विकेट गमावले. एलिमिनेटरमध्ये हॅटट्रिक घेणार्‍या इस्सी वोंगने शफाली वर्मा (११), अ‍ॅलिस कॅप्सी (०) आणि जेमिमाह रॉड्रिग्ज (९) यांना बाद करून पॉवरप्लेमध्येच दिल्लीला बॅकफूटवर आणले. मेग लॅनिंगने एक बाजू धरून ठेवली होती. कॅप्सी आणि लॅनिंग यांनी चौथ्या विकेटसाठी भागीदारी केली पण कॅप्सी २१ चेंडूत १८ धावा करून तंबूत परतली. पाठोपाठ यानंतर कर्णधार मेग लॅनिंग धावबाद झाली. त्याने २९ चेंडूत ३५ धावा केल्या. एकवेळेस असे वाटत होते की दिल्ली १०० धावांचा आकडा पार करेल की नाही पण शिखा पांडे आणि राधा यादवने तुफान अर्धशतकी भागीदारी करत मुंबईला चांगलेच झुंजवले. दोघींनी प्रत्येकी २७-२७ धावा केल्या. विजयासाठी आता १३२ धावांचे आव्हान ठेवले होते. ते त्यांनी सहज पार केले.

महिला प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेला मुंबई इंडियन्सच्या रूपात पहिला वहिला विजेता संघ मिळाला आहे. या विजयामुळे कदाचित पुरुष मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचाही आत्मविश्वास वाढला असेल. कारण, ३१ मार्चपासून आयपीएल २०२३ (IPL 2023) हंगामाला सुरुवात होत आहे. 

Live Updates

Mumbai Indians Women (MI-W) vs Delhi Capitals Women (DC-W) Highlights Score Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध दिल्ली कॅपिटल महिला अंतिम सामना हायलाइट्स

22:49 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: मुंबई इंडियन्सने कोरले wpl ट्रॉफीवर नाव

सलग तीन आठवड्यांपासून सुरु असणारी महिला प्रीमिअर लीगचे आज समारोप झाला असून मुंबई इंडियन्सने आम्हीच खरे विजयाचे दावेदार होतो हे सिद्ध केले. दिल्लीवर आठ गडी राखून wpl ट्रॉफीवर नाव कोरले.

मुंबई इंडियन्स १३४-३

https://twitter.com/wplt20/status/1640039381464670209?s=20

22:37 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: सामना रोमांचक स्थितीत

महिला प्रीमिअर लीगचा अंतिम सामना रोमांचक स्थितीत पोहचला असून ११ चेंडूत १७ धावांची गरज आहे. त्यात नॅटली सिव्हर-ब्रंटने ५२ चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले.

मुंबई इंडियन्स ११५-३

22:30 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, हरमनप्रीत कौर बाद

दिल्ली कॅपिटल्सला अखेर जोडी फोडण्यात यश आले असून शिखा पांडेने कर्णधार हरमनप्रीत कौरला धावबाद केले. तिने ३९ चेंडूत ३७ धावा केल्या. सध्या सामना खूप रोमांचक झाला आहे.

मुंबई इंडियन्स ९५-३

22:11 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: हरमनप्रीतची शानदार फटकेबाजी

नॅटली सिव्हर-ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी मुंबई इंडियन्सचा डाव सावरत संघाला सुस्थितीत नेले आहे. त्यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा सामना जिंकण्यासाठी ही जोडी फोडणे आवश्यक आहे.

मुंबई इंडियन्स ७४-२

21:55 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: मुंबईला धावगती वाढवण्याची गरज

सलामीवीर लवकर तंबूत गेल्याने मुंबईची धावगती कमी झाली आहे. हरमनप्रीत कौर – नॅटली सिव्हर-ब्रंट हे खेळपट्टीवर टिकून असून त्यांना मोठे फटके मारण्याची गरज आहे.

मुंबई इंडियन्स ४२-२

21:38 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: मुंबईला दुसरा धक्का, हिली मॅथ्यूज बाद

धावांचा पाठलाग करताना यास्तिका पाठोपाठ हिली मॅथ्यूजही बाद झाली, तिला जेस जोनासनने झेलबाद केले. तिने केवळ १३ धावांचे योगदान दिले. अरुंधती रेड्डीने अप्रतिम झेल घेतला.

मुंबई इंडियन्स २३-२

21:28 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: मुंबईला पहिला धक्का, यास्तिका भाटिया बाद

दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेल्या १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची खराब सुरुवात झाली. यष्टीरक्षक यास्तिका भाटिया ३ चेंडूत ४ धावा करून बाद झाली. तिला राधा यादवने बाद केले.

मुंबई इंडियन्स १३-१

21:10 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: दिल्लीने मुंबईसमोर ठेवले १३२ धावांचे आव्हान

एकवेळेस असे वाटत होते की दिल्ली १०० धावांचा आकडा पार करेल की नाही पण शिखा पांडे आणि राधा यादवने तुफान अर्धशतकी भागीदारी करत मुंबईला चांगलेच झुंजवले. दोघींनी प्रत्येकी २७-२७ धावा केल्या. विजयासाठी आता १३२ धावांचे आव्हान ठेवले आहे.

दिल्ली कॅपिटल्स १३१-९

https://twitter.com/wplt20/status/1640016517868969985?s=20

20:48 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: दिल्लीला एकाच षटकात दोन धक्के

अंतिम सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय मुंबईने चुकीचा ठरवला. दिल्लीला एकाच षटकात दोन धक्के बसले. हेली मॅथ्यूजने दोन विकेट्स घेत निर्धाव षटक टाकले. मिन्नू मणीने अवघी एक धाव केली तर यष्टीरक्षक तानिया भाटिया खाते उघडू शकली नाही.

दिल्ली कॅपिटल्स ७९-९

20:34 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: दिल्लीचे विकेट्स पडण्याचे सत्र सुरूच

दिल्लीचे विकेट्स पडण्याचे सत्र सुरूच असून एकापाठोपाठ एक विकेट्स पडत आहेत. अरुंधती रेड्डी भोपळाही न फोडता माघारी परतली. तर पुढच्याच षटकात हिली मॅथ्यूजने स्वतःच्याच गोलंदाजीवर अफलातून झेल घेत जेस जोनासनला अवघ्या २ धावांवर बाद केले. दिल्लीला सध्या मोठ्या भागीदारीची गरज आहे.

दिल्ली कॅपिटल्स ७५-७

20:30 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: दिल्ली कॅपिटल्स मोठा धक्का, कर्णधार मेग लॅनिंग धावबाद

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला असून कर्णधार मेग लॅनिंग बाद झाली. दिल्लीची एकमेव आधारस्तंभ अशा लॅनिंगने ३५ धावा केल्या. तिला अमनज्योत कौरने धावबाद केले. सध्या दिल्ली संकटात सापडली आहे.

दिल्ली कॅपिटल्स ७४-५

20:25 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: दिल्लीला चौथा धक्का, मारिझान कॅप बाद

दिल्लीच्या एका बाजूने विकेट्स सातत्याने विकेट्स पडत असून कर्णधार मेग लॅनिंग अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे. मारिझान कॅप १८ धावा करून बाद झाली आहे. तिला अमेलिया केरने बाद केले.

दिल्ली कॅपिटल्स ७३-४

20:12 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: पॉवर प्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सची खराब सुरुवात

पॉवर प्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सची खराब सुरुवात झाली आहे. इस्सी वोंगनेही दिल्ली कॅपिटल्सचे कंबरडे मोडले आहे. तिने पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जेमिमा रॉड्रिग्जला बाद केले. जेमिमा देखील तिच्या आधीच्या दोन सहकारी (शेफाली आणि कॅप्सी) प्रमाणेच पूर्ण टॉस बॉलवर बाद झाली. आठ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने नऊ धावा करून ती हिली मॅथ्यूजकडे झेलबाद झाली. जेमिमा बाद झाल्यानंतर मारिजन कॅप क्रीजवर आली. संकटमोचक म्हणून कर्णधार मेग लॅनिंग खेळपट्टीवर टिकून आहे.

दिल्ली कॅपिटल्स ५३-३

19:57 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का, जेमिमाह रॉड्रिग्स बाद

पॉवर-प्ले मध्ये दिल्ली कॅपिटल्सची खराब सुरुवात झाली असून तीन विकेट्स गमावल्या आहेत. इस्सी वोंगने फुलटॉस चेंडूवर तिसरी विकेट घेत शानदार गोलंदाजी केली. जेमिमाह रॉड्रिग्स अवघ्या ९ धावा करून बाद झाली.

दिल्ली कॅपिटल्स ३५-३

19:52 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्यासाठी सचिन तेंडूलकर स्टेडियममध्ये दाखल

हरमनप्रीतच्या मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्यासाठी सचिन तेंडूलकर स्टेडियममध्ये दाखल झाला असून त्याच्या सोबत मुंबई इंडियन्सचा पुरुष संघ देखील आला आहे. रोहित शर्मा, सचिन हे हरमनब्रिगेडचा उत्साह वाढवत आहेत.

दिल्ली कॅपिटल्स ३५-२

https://twitter.com/aniket_wani/status/1639996946202124288?t=3bRr09N9mrAD5F44D-LiJQ&s=08

19:46 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का, अ‍ॅलिस कॅप्सी बाद

नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीची खराब सुरुवात झाली. एकाच षटकात दोन विकेट्स पडल्या. अ‍ॅलिस कॅप्सी भोपळाही न फोडता माघारी परतली. तिला इस्सी वोंगने बाद केले. अमनज्योत कौरने तिचा अप्रतिम झेल पकडला.

दिल्ली कॅपिटल्स १२-२

https://twitter.com/wplt20/status/1639994578324586496?s=20

19:41 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का, शफाली वर्मा बाद

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा डाव सुरु झाला आहे. शफाली वर्माने कर्णधार मेग लॅनिंगसह डावाची सुरुवात केली आहे. मुंबईसाठी सिव्हर ब्रंटने गोलंदाजीची सुरुवात केली. शफालीने ४ चेंडूत ११ धावा केल्या, तिला इस्सी वोंगने झेलबाद केले.

दिल्ली कॅपिटल्स १२-१

19:09 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: दोन्ही संघाची काय असेल प्लेईंग-११

महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीत कौरचा संघ प्रथम गोलंदाजी करेल. मुंबईने संघात एकही बदल केलेला नाही. मिन्नू मणी दिल्लीच्या संघात परतला आहे. पूनम यादव यांना बाहेर बसवण्यात आले आहे.

https://twitter.com/wplt20/status/1639985168500035585?s=20

19:05 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: दिल्ली कॅपिटल्सने जिंकली नाणेफेक

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा मेग लॅनिंगने निर्णय घेतला आहे. हरमनसाठी मात्र ही गोष्ट लकी समजली जाते. ज्या-ज्यावेळेस ती नाणेफेक गमावते त्यावेळेस ती सामना जिंकते. आजच्या सामन्यात देखील असेच होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://twitter.com/wplt20/status/1639984668954230784?s=20

18:53 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: अंतिम सामन्यात काय रंग दाखवणार खेळपट्टी?

ब्रेबॉर्न स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या मैदानावर आतापर्यंत ११ टी२० सामने खेळले गेले आहेत ज्यात पाठलाग करणाऱ्या संघाने सहा सामने जिंकले आहेत. दव प्रभावामुळे, कर्णधार लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विचार करू शकतो, परंतु मोठ्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करणे आणि बोर्डवर धावा मिळवणे हा एक चांगला पर्याय आहे. एलिमिनेटर सामन्यात, यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या दडपणाखाली संघ पराभूत झाला . कर्णधार येथे प्रथम फलंदाजी करून धावफलकावर मोठे लक्ष्य ठेवू इच्छितो. येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १५७ आहे, परंतु या स्पर्धेत ती १७०च्या आसपास आहे, जिथे दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघांनी येथे WPL २०२३ मध्ये दहा पैकी सहा सामने जिंकले आहेत.

https://twitter.com/wplt20/status/1639970804569104384?s=20

18:34 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: मुंबई आणि दिल्लीचे संपूर्ण संघ

दिल्ली कॅपिटल्स महिला संघ: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, अ‍ॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राधा यादव, शिखा पांडे, पूनम यादव, जसिया अख्तर, लॉरा हॅरिस, तारा नॉरिस, मिन्नू मणी, अपर्णा मंडल, तीतस साधू, स्नेहा दीप्ती

मुंबई इंडियन्स महिला संघ: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नॅटली सिव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता, सायका इशाक, हीदर ग्रॅहम, क्लो ट्रायॉन, धारा गुजर, सोनम यादव, नीलम बिश्त, प्रियांका बाला

https://twitter.com/wplt20/status/1639951921581809670?s=20

18:28 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: सामना कधी सुरु होणार?

मुंबई इंडियन्स महिला आणि दिल्ली कॅपिटल्स महिला यांच्यातील अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाईल. नाणेफेक संध्याकाळी ७.०० वाजता होईल.

https://twitter.com/wplt20/status/1639654226749161472?s=20

18:23 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी नीरज चोप्राने लावली हजेरी

भारतीय संघाचा ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांना ट्रॉफी जिंकण्यासाठी शुभेच्छा द्यायला गेला होता. यावर त्याने ट्वीटरवर पोस्ट देखील केली आहे. तो या सामन्यासाठी खूप उत्सुक आहे असे त्याने त्यात म्हटले आहे.

https://twitter.com/wplt20/status/1639614211784597504?s=20

18:17 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: मुंबईची बलस्थाने आणि कमजोरी!

बलस्थाने: नॅटली सिव्हर ब्रंट, हेली मॅथ्यूज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यावर मुंबईची फलंदाजी जास्त अवलंबून आहे. ब्रंटने नऊ सामन्यांमध्ये २७२ धावा केल्या आहेत आणि शेवटच्या एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सविरुद्ध नाबाद ७२ धावा करून संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याच वेळी, हिली मॅथ्यूजने नऊ सामन्यांमध्ये २५८ धावा केल्या तर हरमनप्रीतने २४४ धावा केल्या. गोलंदाजीत हिली मॅथ्यूजने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. तिने नऊ सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर सायका इशाकने नऊ सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्या आहेत.

कमजोरी: शेवटचा एलिमिनेटर सामना वगळता मुंबईच्या फलंदाजांची दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध खराब कामगिरी झाली. दिल्लीविरुद्ध मुंबई संघाला आठ विकेट्सवर १०९ धावा करता आल्या, त्यानंतर पुढच्या सामन्यात संघाला नऊ विकेट्सवर १२५ धावाच करता आल्या. अंतिम फेरीत फलंदाजांना एलिमिनेटर सामन्यातील लय कायम राखावी लागणार आहे.

https://twitter.com/wplt20/status/1639889923850539010?s=20

18:11 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: दिल्लीची बलस्थाने आणि कमजोरी!

बलस्थाने: दिल्लीची फलंदाजी मजबूत आहे. कर्णधार मेग लॅनिंग चांगली फॉर्मात आहे आणि ती स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिला शफाली वर्माची चांगली साथ आहे, तिने आतापर्यंत आठ सामन्यांत २४१ धावा केल्या आहेत. दिल्लीच्या गोलंदाजांनीही या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. दिल्लीच्या संघाने गुजरात जायंट्सला नऊ विकेट्सवर १०५ धावांवर रोखले, तर मुंबई इंडियन्सला आठ विकेट्सवर केवळ १०९ धावाच करता आल्या. शिखा पांडेने आठ सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आहेत, तर मारिजन कॅपने तितकेच सामने खेळून दिल्लीकडून नऊ बळी घेतले आहेत.

कमजोरी: दिल्लीच्या फलंदाजांनी स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये २०० पेक्षा जास्त धावा केल्या. यानंतर फलंदाजीत सातत्य न राहणे ही चिंतेची बाब आहे. यानंतर दिल्लीला एकदाही २०० किंवा त्याहून अधिक धावा करता आल्या नाहीत. मुंबईविरुद्धही दिल्लीचा संघ १०५ धावांत गारद झाला आणि मुंबईने हा सामना आठ गडी राखून जिंकला.

18:03 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: दोन्ही संघाच्या कर्णधारांचे झाले फोटोशूट

महिला प्रीमिअर लीगच्या अंतिम सामन्याआधी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार यांनी चमकणाऱ्या ट्रॉफीसोबत फोटोशूट केले. हरमनप्रीत कौर आणि मेग लॅनिंग यांच्यापैकी चाहते हरमनला अधिक पाठिंबा देताना दिसत आहेत. दिल्लीचे प्रेक्षक मात्र मेगच्या बाजूने दिसत आहेत.

https://twitter.com/wplt20/status/1639600091597258754?s=20

17:57 (IST) 26 Mar 2023
MI-W vs DC-W Final: महामुकाबल्यासाठी दोन्ही संघ सज्ज! मुंबई जिंकणार की दिल्ली?

महिला प्रीमियर लीगच्या (WPL) अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचे संघ भिडणार आहेत. दिल्लीचे नेतृत्व मेग लॅनिंग, तर मुंबईचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे. फेब्रुवारीमध्ये, भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरचा संघ मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाकडून टी२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. आता लॅनिंगचे डावपेच मोडून अंतिम फेरीत हरमनप्रीतला पराभूत करण्याचे आव्हान असेल.

https://twitter.com/wplt20/status/1639915100017668098?s=20

Mumbai Indians Women (MI-W) vs Delhi Capitals Women (DC-W) Highlights Score Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध दिल्ली कॅपिटल महिला अंतिम सामना हायलाइट्स

महिला प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेला मुंबई इंडियन्सच्या रूपात पहिला वहिला विजेता संघ मिळाला आहे. या विजयामुळे कदाचित पुरुष मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचाही आत्मविश्वास वाढला असेल. कारण, ३१ मार्चपासून आयपीएल २०२३ (IPL 2023) हंगामाला सुरुवात होत आहे. 

First published on: 26-03-2023 at 17:50 IST

संबंधित बातम्या