WPL 2023 3rd Match UP Warriorz vs Gujarat Giants: मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात आणि यूपीच्या महिला संघात सामना संपन्न झाला. यूपी संघाला स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची चांगली संधी होती आणि त्यांनी ती शेवटच्या काही षटकात मोठे फटके मारत ग्रेसच्या मदतीने ३ विकेट्सने शानदार विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात तोंडचा घास हिरावत अटीतटीच्या सामन्यात यूपी वॉरियर्सचा गुजरातवर ३ विकेट्सने विजय मिळवला. किरण आणि ग्रेस यांनी शानदार अर्धशतकं साजरी केली. गुजरातचा हा सलग दुसरा पराभव आहे.

गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने १६९ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना यूपीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. अवघ्या २० धावांत त्यांनी ३ विकेट्स गमावल्या. कर्णधार अॅलिसा हिली आणि सलामीवीर श्वेता सेहरावत एकाच षटकात बाद झाल्या. त्यांनी अनुक्रमे ७ व ५ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या किरण नवगिरेने दीप्ती शर्माच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. किरणने ४३ चेंडूत अर्धशतक साजरे केले आणि ती त्रिफळाचीत झाली. त्यानंतर आलेल्या ग्रेस हॅरिसने सामन्याचे चित्रच पलटवले. तिने सोफी सोबत ७० धावांची अभेद्य भागीदारी केली. ग्रेसने २६ चेंडूत ५९ धावांची खेळी केली ज्यामुळे यूपीला विजयाचा मार्ग सुकर झाला. तिलाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 DC vs CSK: धोनीच्या सुसाट खेळीने बायको साक्षीही भारावली, सामना हरल्याचं गेली विसरून…
IPL 2024 GT vs MI Highlights in Marathi
IPL 2024 GT vs MI Highlights: शुबमन गिलच्या गुजरातचा हार्दिकच्या मुंबईवर दणदणीत विजय, पहिल्याच सामन्यात ६ धावांनी उडवला धुव्वा
Shikhar Dhawan First Batsman To Hit 900 Boundaries
IPL 2024 : शिखर धवनने पहिल्या सामन्यात रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज

या सामन्यात गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुख्य कर्णधार बेथ मूनी दुखापतग्रस्त असल्याने ती आजच्या सामन्यात खेळू शकली नाही. तिच्या ऐवजी स्नेह राणाने संघाची धुरा सांभाळली. मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या पराभवानंतर पुनरागमनाची आशा होती. मात्र यूपीने त्यावर पाणी फिरवले. या सामन्यात गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६९ धावा केल्या. त्याचबरोबर यूपी वॉरियर्स संघासमोर १७० धावांचे लक्ष्य ठेवले होते.

गुजरात जायंट्सकडून हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावा केल्या. तिने ३२ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने धावा केल्या. त्यामुळे गुजरात संघाला १५० धावांचा टप्पा पार करता आला. त्यानंतर हेमलता आणि स्नेह राणाने अनुक्रमे नाबाद २१ आणि ९ धावा केल्या. त्यामुळे गुजरात संघाला ६ बाद १६९ धावा करता आल्या.

गुजरात जायंट्ससाठी सबभीनेनी मेघना आणि सोफिया डंकले या सलामीवीरांनी डावाची सुरुवात केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी ३४ धावांचे योगदान दिले. ज्यानंतर सोफिया डंकले ११ चेंडूत १३ धावा काढून बाद झाली. तिला दीप्ती शर्माने बोल्ड केले. त्यानंतर सबभीनेनी मेघना २४ (१५), सुष्मा वर्मा ९(१३), अॅनाबेल सदरलँड ८(१०) आणि ऍशलेघ गार्डनर २५(१९) धावांचे योगदान दिले. यूपी वॉरियर्सकडून गोलंदाजी करताना सोफी एक्लेस्टोन दीप्ती शर्माने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर अंजली आणि ताहिला यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.