scorecardresearch

WPL 2023 GGW vs DCW: गुजरात जायंट्सचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

WPL 2023 GGW vs DCW: मुंबईत खेळल्या जाणाऱ्या महिला प्रीमियर लीग २०२३ मध्ये शनिवारी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याला साडेसातला सुरुवात होणार आहे.

WPL 2023 GG-W vs DC-W Updates
गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल (फोटो- ट्विटर)

WPL 2023 GG-W vs DC-W Match Updates: आज महिला प्रीमियर लीग (WPL 2023) मध्ये नववा सामना डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, मुंबई येथे होणार आहे. हा सामना गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जााणार आहे. या सामन्याला साडेसातला सुरुवात होणार आहे. तपुर्वी नाणेफेक पार पडली असून गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात एकीकडे गुजरात जायंट्सची कमान स्नेह च्या हातात असेल आणि दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सची धुरा मेग लॅनिंग हाताळताना दिसेल.
सध्या गुजरातची माजी कर्णधार बेथ मुनी या स्पर्धेतून बाहेर आहे. या सामन्यादरम्यान त्याला आधीच दुखापत झाली होती. त्यांच्या जागी गुजरातची कमान स्नेहा राणाच्या हाती आहे. तर फलंदाजीचे नेतृत्व हरलीन देओल, सोफिया डंकले आणि लॉरा वॉलमार्ट करणार आहेत.

गुजरातसाठी हा सामना बाद फेरीपेक्षा कमी नाही. गुजरातने आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यात फक्त विजय मिळवला आहे. गुणतालिकेत गुजरात चौथ्या तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीकडून पराभव झाल्या स्पर्धेतील सर्व ४ सामने जिंकावे लागतील. दुसरीकडे, दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर त्यांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात मुंबईविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. ४ गुणांसह दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. आज जर दिल्लीने गुजरातला हरवले, तर ते मुंबईशी बरोबरी करून दुसऱ्या क्रमांकावर स्वतःला मजबूत करतील.

खेळपट्टीचा अहवाल –

येथे खेळल्या गेलेल्या महिला टी-२० सामन्यातील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७९ आहे. दुसऱ्या डावात ही संख्या १८० पर्यंत वाढते. डीवाय पाटील स्टेडियमवरील डेक फलंदाजांसाठी उत्कृष्ट आहे. ही खेळपट्टी संथ गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना अनुकूल ठरते.

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: अर्धशतक झळकावत विराट कोहलीने केला मोठा विक्रम, ब्रायन लारालाही टाकलं मागे

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, लॉरा हॅरिस, मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), मिन्नू मणी, राधा यादव, शिखा पांडे, तारा नॉरिस

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): सब्भिनेनी मेघना, लॉरा वोल्वार्ड, हरलीन देओल, ऍशलेग गार्डनर, जॉर्जिया वेरेहम, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), दयालन हेमलता, स्नेह राणा (कर्णधार), किम गर्थ, मानसी जोशी, तनुजा कंवर

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 19:11 IST