Premium

WPL 2023, MI-W vs DC-W Highlights: नवी मुंबईत दिल्लीचा धमाका! मेग-एलिसची चौफेर फटकेबाजी, DC चा MI वर दणदणीत विजय

Mumbai Indians Women vs Delhi Capitals Women Highlights Match Updates : दिल्लीने मुंबईच्या गोलंदाजांचा धु्व्वा उडवला आणि या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला.

WPL 2023 Live MI-W vs DC-W Match Updates
मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध दिल्ली कॅपिटल महिला लाइव्ह

WPL 2023 Highlights Updates, MI-W vs DC-W : नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा १८ वा सामना झाला. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांची दिल्लीच्या गोलंदाजांनी पुरती दमछाक केली. मारिझान कापने भेदक गोलंदाजी करून मुंबईच्या सलामीवर फलंदाज यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूजला स्वस्तात माघारी पाठवलं. त्यानंतर सिवर ब्रंट,अमेलिया केरलाही धावांचा सूर गवसला नाही. पूजा वस्त्रकर, वॉंग आणि कर्णधार हरमप्रीतच्या सावध खेळीमुळं मुंबईची धावसंख्या शंभरी पार झाली अन् दिल्लीला १०७ धावांचं आव्हान मिळालं. मात्र धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी दिल्लीने मुंबईच्या गोलंदाजांचा धु्व्वा उडवला आणि या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला.

शफाली वर्माने सुरुवातीलाच स्फोटक फलंदाजी केली. शफालीने १५ चेंडूत ३३ धावा कुटल्या. तर कर्णधार मेग लॅनिंग आणि एलिस केपसीनेही आक्रमक खेळी करत दिल्लीला विजयाच्या दिशेनं नेलं. मेगने २२ चेंडूत ३२ तर एलिसने १७ चेंडूत ३८ धावा कुटल्या. त्यामुळे दिल्लीने फक्त ९ षटकात ११० धावांचं लक्ष्य गाठून मुंबई इंडियन्सचा पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांवर दिल्लीने भेदक मारा केला. मारिझान कापने मुंबईच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. मारिझान काप, शिखा पांडे आणि जेस जोनासने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मुंबईने २० षटकांत ८ बाद १०९ धावाच केल्या. त्यामुळं दिल्लीला विजयासाठी ११० धावांचं लक्ष्य गाठावं लागणार होतं.

यास्तिका भाटिया फक्त १ धाव करून तंबूत परतली. त्यानंतर हेलीही कापच्या गोलंदाजीवर बाद झाली. हेलीला १० चेंडूत फक्त ५ धावाच करता आल्या. कापने सिवर ब्रंटला भोपळाही फोडू दिला नाही. सिवर कापच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने सावध खेळी करत २६ चेंडूत २३ धावा केल्या. पण तिलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शिखा पांडेच्या गोलंदाजीवर कौर बाद झाली. त्यानंतर पूजा वस्त्रकरने मुंबईची कमान सांभाळली. पूजाने १९ चेंडूत २६ धावा केल्या. इस वॉंगने २४ चेंडूत २३ धाव तर अमनजोत कौरने १६ चेंडूत १९ धावांची खेळी साकारली.

Live Updates
21:14 (IST) 20 Mar 2023
MI-W vs DC-W Live : हेली मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर शफाली वर्मा बाद, दिल्लीला मोठा धक्का

मुंबई इंडियन्सने २० षटकात ८ विकेट्स गमावत दिल्लीला ११० धावांचं आव्हान दिलं आहे. या आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा मैदानात उतरली आहे. शफाली वर्माने चौफेर फटकेबाजी केल्यामुळं दिल्लीची धावसंख्या २ षटकानंतर बिनबाद २२ वर पोहोचली होती. पण त्यानंतर शफालीने चौफेर फटकेबाजी करत १५ चेंडूत ३३ धावा कुटल्या. मात्र, हेलीच्या गोलंदाजीवर शफाली वर्मा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात यष्टीचीत झाली. दिल्लीची धावसंख्या ८ षटकानंतर ९१-१ अशी झाली आहे.

21:01 (IST) 20 Mar 2023
MI-W vs DC-W Live : मुंबईची फलंदाजी गडगडली, विजयासाठी दिल्लीला ११० धावांचं आव्हान

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांवर दिल्लीने भेदक मारा केला. मारिझान कापने मुंबईच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. मारिझान काप, शिखा पांडे आणि जेस जोनासने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. २० षटकांत मुंबईने ८ बाद १०९ धावाच केल्या. त्यामुळं दिल्लीला विजयासाठी ११० धावांची आवश्यकता असणार आहे.

20:38 (IST) 20 Mar 2023
MI-W vs DC-W Live : मुंबईला मोठा धक्का! ५ फलंदाज बाद झाल्यानंतर शिखाने केली कर्णधार कौरची शिकार

१५ षटकानंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या ७५-६ अशी झाली. कर्णधार हरमनप्रीत कौरला या सामन्यातही अर्धशतकी खेळी करता आली नाही. शिखा पांडेच्या गोलंदाजीवर कौर २३ धावांवर बाद झाली. सीमारेषेजवळ असणाऱ्या जेमिमाने कौरचा झेल पकडला आणि मुंबईला मोठा धक्का दिला. दरम्यान, मुंबईची धावसंख्या १७ षटकानंतर ८८-६ अशी झाली. १९ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १०४-७ अशी झालीय.

20:28 (IST) 20 Mar 2023
MI-W vs DC-W Live : पाच फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत करतेय सावध खेळी, मुंबई, ६९-५

दिल्लीची गोलंदाज मारिझान कापने तिसऱ्या षटकात मुंबईच्या दोन फलंदाजांना बाद केलं. यास्तिका भाटिया फक्त एक धाव करून माघारी परतली. तर त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर कापने सिवर ब्रंटची दांडी गुल केली. त्यानंतर शिखा पांडेच्या गोलंदाजीवर हेली मॅथ्यूजचा जेमिमा रॉड्रिग्जने अप्रतिम झेल घेतला. ४ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १३-३ अशी झाली होती. त्यानंतर केर बाद झाल्यानंतर पूजा वस्त्रकरने धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. पण तिलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दरम्यान, मुंबई १३ षटकानंतर ६९-५ वर पोहोचली आहे.

19:45 (IST) 20 Mar 2023
MI-W vs DC-W Live : मुंबईची धावसंख्या गडगडली, पाच फलंदाज झाले बाद, ६१-५

दिल्लीची गोलंदाज मारिझान कापने तिसऱ्या षटकात मुंबईच्या दोन फलंदाजांना बाद केलं. यास्तिका भाटिया फक्त एक धाव करून माघारी परतली. तर त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर कापने सिवर ब्रंटची दांडी गुल केली. त्यानंतर शिखा पांडेच्या गोलंदाजीवर हेली मॅथ्यूजचा जेमिमा रॉड्रिग्जने अप्रतिम झेल घेतला. ४ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १३-३ अशी झाली आहे. पाच षटकानंतर मुंबईची धावसंक्या १७-३ वर पोहोचली. ६ षटकानंतर मुंबई २०-३ अशा स्थितीत आहे. १२ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ६१-५ अशी झाली आहे.

19:34 (IST) 20 Mar 2023
MI-W vs DC-W Live : मुंबई इंडियन्सच्या सलामीवीर फलंदाज यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज मैदानात

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या सलामीवीर फलंदाज हेली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. मुंबईने पहिल्या षटकात फक्त दोन धावा केल्या आहेत. २ षटकानंतर मुंबईच्या बिनबाद ६ धावा झाल्या आहेत.

19:11 (IST) 20 Mar 2023
MI-W vs DC-W Live : मुंबई इंडियन्सची फलंदाजी, दिल्लीचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात थोड्याच वेळात १८ वा सामना रंगणार आहे. तत्पुर्वी दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं मुंबईला पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करावी लागणार आहे.

17:33 (IST) 20 Mar 2023
MI-W vs DC-W Live : मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार; डी वाय पाटील स्टेडियममध्ये रंगणार महामुकाबला

महिला प्रीमियर लीगमध्ये एकाहून एक रंगतदार सामने होत असून आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात १८ वा सामना होणार आहे. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये मुंबई विरुद्ध दिल्ली असा महामुकाबला होणार आहे. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत झालेल्या सहापैकी ५ सामन्यांमध्ये विजय संपादन केलं आहे. त्यामुळे मुंबईने सर्वात आधी प्ले ऑफ मध्ये प्रेवश केला असून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. तर दिल्लीला सहापैकी ४ सामन्यांमध्ये विजयाचा सूर गवसल्याने त्यांचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. सलग पाच सामने जिंकणाऱ्या मुंबईचा मागील सामन्यात यूपी वॉरियर्सने पराभव केला होता. त्यामुळे दिल्लीविरुद्ध होणाऱ्या आजच्या सामन्यात मुंबईच्या विजयाच्या आशा पल्लवीत होतात का? हे पाहावं लागणार आहे.

Mumbai Indians Women (MI-W) vs Delhi Capitals Women (DC-W) Highlights Updates : मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध दिल्ली कॅपिटल महिला लाइव्ह

First published on: 20-03-2023 at 17:31 IST
Next Story
WPL 2023 GG vs UPW: गुजरातने यूपीला दिले १७९ धावांचे लक्ष्य, हेमलता-गार्डनरची झंझावाती अर्धशतकं