MI-W vs UPW-W, WPL 2023 Eliminator Match Score Highlights updates: महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा ७२ धावांनी पराभव केला. या विजयासह त्याने अंतिम फेरीत धडक मारली. आता २६ मार्च रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्याचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईने २० षटकांत ४ बाद १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीचा संघ १७.४ षटकांत ११० धावांवर गारद झाला. यूपीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो अपयशी ठरताना दिसला. प्रथम फलंदाजीला आमंत्रित करत मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्ससमोर १८३ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले आहे. जर यूपीला अंतिम फेरी गाठायची असेल तर हे आव्हान कसे पार करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मुंबईकडून नॅटली सिव्हर-ब्रंटने शानदार खेळी केली. त्याने ३८ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. यादरम्यान तिने नऊ चौकार आणि दोन षटकारांचा साज चढवला. नॅटली सिव्हर-ब्रंट आणि अमेलिया केर या दोघींनी हरमन बाद झाल्यानंतर अर्धशतकी भागीदारी झाली. ६० धावांची भागीदारी मोडण्यात यूपीला यश आले. अमेलियाने १९ चेंडूत २९ धावा केल्या. तिला सोफी एक्लेस्टोनने झेलबाद केले. त्यानंतर आलेली पूजा वस्त्रकार आणि ब्रंट यांनी मोठे फटके मारत आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. तत्पूर्वी, सलामीवीर हीली मॅथ्यूजने २६ चेंडूत २६ आणि यास्तिका भाटियाने १८ चेंडूत २१ धावा केल्या. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने १५ चेंडूत १४ धावा केल्या. पूजा वस्त्राकरने चार चेंडूत ११ धावा केल्यानंतर नाबाद राहिली. यूपी वॉरियर्सकडून सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक दोन विकेट्स घेतले. अंजली सरवानी आणि पार्श्वी चोप्रा यांनी प्रत्येकी एक विकेट घेत तिला मदत केली. WPL नियमांनुसार, साखळी टप्प्यात गुणतालिकेत शीर्षस्थानी असलेला संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असणारे संघ एलिमिनेटर सामना खेळत आहेत. हा सामना जिंकणाऱ्या संघाला अंतिम सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून थेट अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. मुंबई आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील एलिमिनेटरचा विजेता रविवारी दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे.