Mumbai Indians Women vs Gujarat Giants Women Updates: शनिवारी (दि. ४ मार्च) नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये महिला प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेला सुरुवात झाली. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई संघाचा सामना गुजरात जायंट्सशी झाला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाने तब्बल १४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हरमनप्रीतची शानदार तुफानी अर्धशतकी खेळी आणि त्याला गोलंदाजांची मिळालेली साथ यामुळे गुजरातचा अक्षरशः धुव्वा उडवला. हरमनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकत गुजरात गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबईने प्रथम फलंदाजी करत ऐतिहासिक धावसंख्या उभारली. कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने २०७ धावा चोपत गुजरातसमोर २०८ धावांचे भले मोठे आव्हान ठेवले होते. मात्र धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या पाच धावांत त्यांनी ३ विकेट्स गमावल्या त्यात हरलीन आणि गार्डनर यांना भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार बेथ मूनी तिसऱ्याच चेंडूवर दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर पडली. दयालन हेमलता सोडल्यास कोणालाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. तिने २३ चेंडूत २९ धावा केल्या. ठराविक अंतरावर विकेट्स गमावल्याने अवघ्या ६४ धावांत गाशा गुंडाळला गेला.

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: दिल्लीविरूद्ध अवघ्या ५३ चेंडूतील पराभवानंतर शुबमन गिल भडकला, गुजरातच्या कर्णधाराने कोणावर फोडले पराभवाचे खापर
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Kwena Maphaka has recorded embarrassing record in IPL 2024
IPL 2024 : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वर्ल्डकप गाजवणाऱ्या मुंबईच्या गोलंदाजाची धुलाई; नावावर नोंदला गेला नकोसा विक्रम
Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians IPL 2024 Live Score in Marathi
IPL 2024 : ‘रन’ धुमाळीत हैदराबादची सरशी, मुंबई इंडियन्सवर ३१ धावांनी विजय

मुंबईकडून सायका इशाकने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तिने कसून गोलंदाजी करत गुजरातच्या नाकेनऊ आणले. नेट सायव्हर-ब्रंट आणि अमेलिया केरने प्रत्येकी २ विकेट्स घेत तिला साथ दिली. तर वेगवान गोलंदाज इस्सी वोंगला देखील १ विकेट घेण्यात यश मिळाले.टिच्चून गोलंदाजी करणाऱ्या मुंबईकरांपुढे गुजरातचा निभाव लागू शकला नाही.

यष्टीरक्षक यास्तिका भाटिया अवघ्या एका धावेवर बाद झाल्यानंतर हिली मॅथ्यूज आणि नेट सायव्हर यांनी मुंबईचा डाव सावरला. मात्र अर्धशतक करण्यापूर्वीच मॅथ्यूज ४७ धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेली कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अमेलिया केर यांच्यात तब्बल ८९ धावांची भक्कम भागीदारी झाली आणि तिथेच गुजरातची अवस्था बिकट झाली होती. हरमनप्रीतने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत महिला प्रीमिअर मधील पहिले-वहिले अर्धशतक झळकावले. तिने ३० चेंडूत ६५ धावांची तुफानी खेळी केली. तर अमेलियाने २४ चेंडूत ४५ धावांची खेळी करत तिला साथ दिली.

गुजरातकडून स्नेह राणा खूप महाग ठरली पण तिलाच सर्वाधिक २ विकेट्स घेता आल्या. तर ऐश गार्डनर, तनुजा कंवर आणि जॉर्जिया वेअरहॅम यांना प्रत्येकी १-१ विकेट्स घेण्यात यश मिळाले. गुजरातला हा सामना जिंकण्यासाठी मोठ्या भागीदारीची आवश्यकता होती. मात्र त्यात जायंट्स अपयशी पडले. दवाचा किती परिणाम होतो याची सर्वांना उत्सुकता होती या सामन्यात फारसे तसे काही पहावयास मिळाले नाही.