WPL 2023 Highlights updates, MI-W vs UPW-W : महिला प्रीमियर लीगमध्ये एकाहून एक रंगतदार सामने होत असून आज नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमध्ये या लीगचा १५ सामना सुरु आहे. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स या मैदानात आमने-सामने उतरले आहेत. मुंबईने आतापर्यंत झालेल्या सर्व पाच सामन्यांमध्ये विजय मिळवून प्ले ऑफमध्ये प्रेवश केला आहे. ५ सामन्यांमध्ये १० गुण प्राप्त करून मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर यूपी वॉरियर्सने आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यांपैकी २ सामन्यांवर विजय संपादन केल्याने गुणतालिकेत ते चौथ्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, आजच्या सामन्यात यूपीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांवर यूपीच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. यूपीची फिरकीपटू सोफी एल्केस्टोनने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. मुंबईच्या महत्वाच्या तीन फलंदाजांना बाद करून सोफीने मुंबईच्या धावसंख्येवर ब्रेक लावला. दरम्यान, इजी वॉन्गने १९ चेंडूत नाबाद ३२ धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सने २० षटकांत सर्वबाद १२७ धावा केल्या. यूपीला विजयासाठी १२८ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy
हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”
match prediction ipl 2024 royal challengers bangalore match against sunrisers hyderabad today
IPL 2024 : बंगळूरुसमोर विजयाचे आव्हान; सनरायजर्स हैदराबादशी आज गाठ; हेड, कोहलीकडून अपेक्षा
Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
Playoff equation in IPL 2024 Updates in Marathi
IPL 2024 Playoffs : सात पराभवानंतरही आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी, मुबंई देखील दावेदार, जाणून घ्या समीकरण

मुंबईसाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने २२ चेंडूत २५ धावा केल्या. सलामीवीर फलंदाज हिली मॅथ्यूजने ३० चेंडूत ३५ धावा कुटल्या. मुंबईच्या इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. यूपीच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने मुंबईच्या फलंदाजांना फलकावर मोठी धावसंख्या लावता आला नाही. वेगवान गोलंदाज अंजलीने यास्तिका भाटियाला बाद करून एक विकेट घेतला. तर राजेश्वरी गायकवाडने अमेलिया केर आणि हुमैरा काझीला बाद करून दोन विकेट्स मिळवल्या. सोफीने ३ तर दिप्ली शर्माला २ विकेट मिळाली.

यूपीची वेगवान गोलंदाज अंजली सरवानीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून मुंबईची सलामीवीर फलंदाज यास्तिका भाटियाची दांडी गुल केली. यास्तिका १५ चेंडूत ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. दरम्यान, पॉवर प्लेमध्ये मुंबईची धावसंख्या ३१-१ झाली. सातव्या षटकानंतर मुंबई ३८-१ वर पोहोचली होती. पण आठव्या षटकात मुंबईला दुसरा धक्का बसला. यूपीची गोलंदाज सोफीने मुंबईच्या सिवरला ५ धावांवर पायचीत केलं. नवव्या षटकानंतर मुंबईची धावसंख्या ४५-२ अशी झाली होती. दहाव्या षटाकत ११ धावांची वाढ झाल्याने मुंबई ५६-२ वर पोहोचली होती.

Live Updates

Mumbai Indians Women (MI-W) vs UP Worriers Women (UPW-W) Highlights Updates : मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध यूपी वॉरियर्स महिला 

18:57 (IST) 18 Mar 2023
MI-W vs UPW-W : यूपीच्या सोफीची चमकदार कामगिरी; यूपी वॉरियर्सचा मुंबईवर मोठा विजय

शेवटच्या षटकांपर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात यूपीने मुंबईचा पराभव केला. १२९ धावांचा पाठलाग करणाऱ्या यूपीने लीगमधील तिसरा सामना जिंकला. यूपीची अष्टपैलू खेळाडू सोफी एक्लेस्टोनने गोलंदाजीतही भेदक मारा केला आणि कठीण परिस्थितीत षटकार ठोकून यूपीला विजय मिळवून दिला. यूपीने ५ गडी गमावत १२९ धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केला.

https://twitter.com/wplt20/status/1637081061149773824?s=20

18:13 (IST) 18 Mar 2023
MI-W vs UPW-W : मुंबईच्या गोलंदाजांनी यूपीच्या ५ फलंदाजांना दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता, UPW : 109-5

मुंबईने दिलेल्या १२८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या यूपीच्या फलंदाजांच्या मुंबईच्या गोलंदाजांनी नाकीनऊ आणले. पॉवर प्लेमध्येच कर्णधार एलिसा हिलासह देविका वैद्य आणि किरण नवगिरेला मुंबईच्या गोलंदाजांनी बाद केलं. त्यामुळं १४ षटकानंतर यूपीची धावसंख्या ८६-४ अशी झाली होती. त्यानंतर १७ षटकानंतर यूपी १०९-५ अशा धावसंख्येवर पोहोचली आहे.

https://twitter.com/wplt20/status/1637073155910139905?s=20

17:21 (IST) 18 Mar 2023
MI-W vs UPW-W : यूपीची कर्णधार एलिसा हिली झाली बाद, मुंबई इंडियन्सचा भेदक मारा, UPW : ६६-३

यूपी वॉरियर्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून मुंबई इंडियन्सला २० षटकांत सर्वबाद १२७ धावांवर रोखलं. त्यामुळे यूपीला या सामन्यात विजय संपादन करण्यासाठी १२८ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे. यूपीची कर्णधार एलिसा हिली आणि सलामीवीर फलंदाज देविका वैद्य मैदानात उतरल्या. पण हेली मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर देविका वैद्यचा कर्णधार हरमनप्रीत कौरने अप्रतिम झेल घेतला. ५ षटकानंतर यूपीची धावसंख्या २१-१ अशी झालीय. पण सहाव्या षटकात मुंबई इंडियन्सची गोलंदाज इजी वॉन्गने कर्णधार एलिसा हिलीला ८ धावांवर बाद केलं, हिलीच्या पाठोपाठ किरण नवगिरेही १२ धावांवर बाद झाली. त्यामुळं पॉवर प्ले मध्ये यूपीची धावसंख्या २७-३ अशी झाली. ११ षटकानंतर यूपी ६६-३ धावसंख्येवर पोहोचली आहे.

https://twitter.com/wplt20/status/1637066859513266176?s=20

https://twitter.com/wplt20/status/1637056880743956480?s=20

16:19 (IST) 18 Mar 2023
MI-W vs UPW-W : यूपीच्या गोलंदाजांनी मुंबईला १२७ धावांवर रोखलं, यूपी वॉरियर्सला १२९ धावांचं दिलं आव्हान

मुंबई इंडियन्सचे टॉप ऑर्डरचे तीन फलंदाज माघारी परतलो आहेत. यास्तिका भाटिया आणि सिवर ब्रंटला धावांचा सूर गवसला नाही. पण हिली मॅथ्यूजने आक्रमक खेळी करून यूपीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. परंतु, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना हिलीला यूपीची गोलंदाज सोफीने ३० धावांवर बाद केलं. त्यामुळे मुंबईची धावसंख्या ११ षटकानंतर ६१-३ झाली होती. पण त्यानंतर बाराव्या षटकात राजेश्वरीने अमेलिया केरला ३ धावांवर बाद केलं. त्यानंतर लेगचच मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर दिप्ती शर्माच्या गोलंदाजीवर २५ धावांवर बाद झाली. १९ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १२७-९ अशी झाली होती. त्यानंतर २० षटकात मुंबई सर्वबाद १२७ धावाच करू शकली.

15:51 (IST) 18 Mar 2023
MI-W vs UPW-W : यूपीचा भेदक मारा, यास्तिकानंतर सिवर परतली तंबूत, मुंबई ५६-२

यूपीची वेगवान गोलंदाज अंजली सरवानीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून मुंबईची सलामीवीर फलंदाज यास्तिका भाटियाची दांडी गुल केली. यास्तिका १५ चेंडूत ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. दरम्यान, पॉवर प्लेमध्ये मुंबईची धावसंख्या ३१-१ झाली. सातव्या षटकानंतर मुंबई ३८-१ वर पोहोचली. पण आठव्या षटकात मुंबईला दुसरा धक्का बसला. यूपीची गोलंदाज सोफीने मुंबईच्या सिवरला ५ धावांवर पायचीत केलं. नवव्या षटकानंतर मुंबईची धावसंख्या ४५-२ अशी झाली. दहाव्या षटाकत ११ धावांची वाढ झाल्याने मुंबई ५६-२ वर पोहोचली आहे.

https://twitter.com/wplt20/status/1637036518626951169?s=20

15:34 (IST) 18 Mar 2023
MI-W vs UPW-W : सलामीवीर फलंदाज यास्तिका भाटिया आणि हिली मॅथ्यूज मैदानात, मुंबई २४-०

मुंबई इंडियन्ससाठी यास्तिका भाटिया आणि हिली मॅथ्यूज सलामी फलंदाज म्हणून पुन्हा एकदा मैदानात उतरल्या आहेत. यास्तिकाने मागील दोन सामन्यात चमकदार कामिगिरी केलीय. तसंच मॅथ्यूजनही चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने यूपीच्या गोलंदाजांपुढं त्यांना बाद करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान राजेश्वरी गायकवाडने पहिलं षटक फेकलं असून मुंबईची धावसंख्या पहिल्या षटकानंतर बिनबाद ४ धावांवर पोहोचली. त्यानंतर ग्रेसच्या दुसऱ्या षटकात मुंबईला फक्त दोनच धावा मिळाल्या. तर अंजलीच्या तिसऱ्या षटकानंतर मुंबईची धावसंख्या ११-० झाली. चौथ्या षटकात हिलीने सलग दोन षटकार ठोकून मुंबईच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. चार षटकानंतर मुंबईची धावसंख्या २४- ० अशी होती.

https://twitter.com/wplt20/status/1637027091547033601?s=20

15:08 (IST) 18 Mar 2023
MI-W vs UPW-W : मुंबईची फलंदाजी; यूपीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय

नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात थोड्याच वेळात रंगतदार सामना सुरु होणार आहे. तत्पुर्वी, यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईने आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यांमध्ये विजयावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे गुणतालिकेत मुंबई अव्वल स्थानावर आहे. तर यूपीचा संघ तिसऱ्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.

https://twitter.com/wplt20/status/1637024534296678401?s=20

13:28 (IST) 18 Mar 2023
MI-W vs UPW-W : मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात महामुकाबला, कोण मारणार बाजी?

महिला प्रीमियर लीगमध्ये एकाहून एक रंगतदार सामने होत असून आज नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमध्ये या लीगचा १५ सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स या मैदानात आमने-सामने उतरणार आहेत. मुंबईने आतापर्यंत झालेल्या सर्व पाच सामन्यांमध्ये विजय मिळवून प्ले ऑफमध्ये प्रेवश केला आहे. ५ सामन्यांमध्ये १० गुण प्राप्त करून मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर यूपी वॉरियर्सने आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यांपैकी २ सामन्यांवर विजय संपादन केल्याने गुणतालिकेत ते चौथ्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा यूपी वॉरियर्सचा पराभव करून या लीगमधील विजयी घौडदौड सुरुच ठेवते का? हे पाहावं लागणार आहे.

https://twitter.com/wplt20/status/1637012357636571136?s=20

https://twitter.com/wplt20/status/1637008387841093632?s=20

WPL 2023 Live Cricket Score, MI-W vs UPW-W Match Updates

मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध यूपी वॉरियर्स महिला 

Mumbai Indians Women (MI-W) vs UP Worriers Women (UPW-W) Highlights Updates : डी वाय पाटील स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात WPL चा १५ वा सामना झाला.