WPL 2023, MIW vs DCW: मुंबईच्या आक्रमणापुढे दिल्ली नेस्तनाबूत! MIच्या रणरागिणींनी पहिल्यावहिल्या WPL ट्रॉफीवर कोरले नाव

सलग तीन आठवड्यांपासून सुरु असणारी महिला प्रीमिअर लीगचे आज समारोप झाला असून मुंबई इंडियन्सने आम्हीच खरे विजयाचे दावेदार होतो हे सिद्ध केले. दिल्लीवर सात गडी राखून wpl ट्रॉफीवर नाव कोरले.

WPL 2023, MIW vs DCW: Mumbai beat Delhi by 7 wickets Mumbai Indians won their first ever WPL trophy
सौजन्य- WPL २०२३ (ट्विटर)

सलग तीन आठवड्यांपासून सुरु असणारी महिला प्रीमिअर लीगचे आज समारोप झाला असून मुंबई इंडियन्सने आम्हीच खरे विजयाचे दावेदार होतो हे सिद्ध केले. दिल्लीवर सात गडी राखून wpl ट्रॉफीवर नाव कोरले. पहिल्या-वहिल्या महिलांच्या प्रीमिअर लीगचे bcciने केलेले आयोजन अतिशय सुंदर झाले. भारताचे सर्व जगभरात कौतुक करण्यात आले. दिल्लीने ठेवलेल्या १३२ धावांचा पाठलाग मुंबईने यशस्वीरित्या करत मैलाचा दगड पार केला.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेल्या तुटपुंज्या १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर हेली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक) अवघ्या २३ धावात बाद झाल्या. मात्र त्यानंतर आलेल्या नॅटली सिव्हर-ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात झालेल्या अर्धशतकी भागीदारीने मुंबईचा डाव सावरला. हरमनप्रीत कौर ३९ चेंडूत ३७ धावा करून बाद झाली. मात्र सिव्हर-ब्रंटने एक बाजू लावून शानदार अर्धशतक झळकावले. त्यामुळे मुंबईचा विजय सुकर झाला.  

इंग्लंडची अनुभवी खेळाडू नॅटली सिव्हर-ब्रंटने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवले आहे. तिने ५५ चेंडूत नाबाद ६० धावा करत सांघिक विजेतेपद पटकावले.दिल्लीने २० षटकात ९ गडी गमावून १३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने १९.३ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावा करून सामना जिंकला. मुंबई फ्रँचायझीच्या खात्यातील ही सहावी ट्रॉफी आहे. त्याचा पुरुष संघ आयपीएलमध्ये पाच वेळा चॅम्पियन बनला आहे.

नॅटलीने अमेलिया केरसोबत चौथ्या विकेटसाठी २० चेंडूत नाबाद ३९ धावांची भागीदारी केली. अमेलिया केर आठ चेंडूत १४ धावा करून नाबाद राहिली. नॅटलीने याआधी कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ७४ चेंडूत ७२ धावांची भागीदारी केली होती. हरमनप्रीत ३९ चेंडूत ३७ धावा करून बाद झाली. हिली मॅथ्यूजने १३ आणि यास्तिका भाटियाने चार धावा केल्या. दिल्लीकडून राधा यादव आणि जेस जोनासन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा: Shikhar Dhawan: “मी निवडकर्ता असतो तर माझ्या जागी शुबमन गिल…”, कारकिर्दीच्या वाईट टप्प्यावर शिखर धवनचे मोठे विधान

राधा-शिखाची झुंझार खेळी व्यर्थ

दिल्ली कॅपिटल्सबद्दल बोलायचे झाले तर एके काळी त्याच्या नऊ विकेट ७९ धावांत पडल्या होत्या. संघाला १०० धावांचा टप्पाही गाठता येणार नाही, असे वाटत होते. तिथून शिखा पांडे आणि राधा यादवने डाव सांभाळला. दोघींनी शेवटच्या विकेटसाठी २४ चेंडूत नाबाद ५२ धावांची भागीदारी केली. राधाने १२ चेंडूत नाबाद २७ तर शिखाने १७ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. राधाने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचवेळी शिखाच्या बॅटमधून तीन चौकार बाहेर पडले. तिने षटकारही मारला.

दिल्लीच्या दिग्गज फलंदाजांनी या सामन्यात निराशा केली. कर्णधार मेग लॅनिंग वगळता कोणीही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाही. लॅनिंगने २९ चेंडूत ३५ धावा केल्या. ती दुर्दैवाने धावबाद झाली. मारिझान कॅपने १८ आणि शफाली वर्माने ११ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून इस्सी वोंग आणि हीली मॅथ्यूजने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. अमेलिया केरला दोन विकेट्स घेण्यात यश मिळाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 22:53 IST
Next Story
SA vs WI 2nd T20: जॉन्सन चार्ल्सने ३९ चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, अनेक विक्रम मोडताना गेललाही टाकले मागे
Exit mobile version