WPL 2023 MIW vs RCBW: हरमनप्रीतच्या मुंबईचा स्मृतीच्या आरसीबीवर शानदार विजय; अमेलिया केरचे दमदार अष्टपैलू प्रदर्शन

WPL 2023 MIW vs RCBW:रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगचा १९ वा सामना खेळला गेला. मुंबई इंडियन्सने हा सामना ४ विकेटने जिंकला.

Women’s Premier League 2023 : Watch MI-W vs RCB-W Live Match Updates in Marathi
मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर महिला (फोटो- ट्विटर)

WPL 2023 MI-W vs RCB-W Updates:महिला प्रीमियर लीगच्या १९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चार गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मुंबईला दोन गुण मिळाले आणि आता त्याचे एकूण १२ गुण झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे १० गुण आहेत. दिल्लीला यूपी वॉरियर्सविरुद्ध सामना खेळायचा आहे. दिल्लीने हा सामना जिंकल्यास उत्तम नेट रनरेट असलेला संघ अव्वल स्थानावर जाईल.

स्मृती मंधानाच्या आरसीबीला महिला प्रीमियर लीगमधील विजयासह त्यांची मोहीम संपवता आली नाही. त्यांना त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध चार गडी राखून पराभव पत्करावा लागला. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने आरसीबीला २० षटकांत नऊ गडी गमावून १२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १६.३ षटकांत ६ बाद १२९ धावा करत विजय नोंदवला.

प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूची सुरुवात खराब झाली. सोफी डिव्हाईन (०) पहिल्याच षटकात धावबाद झाली. यानंतर अमेलिया केरने बंगळुरूला तीन धक्के दिले. तिने प्रथम कर्णधार स्मृती मंधानाला यष्टिका भाटियाकडे झेलबाद केले. मंधाना २४ धावा करू शकली. यानंतर हीदर नाइटला वोंगने झेलबाद केले. तिला १२ धावा करता आल्या. कनिका आहुजाला अमेलियाने यष्टिरक्षक यस्तिकाच्या हातून यष्टिचित केले. कनिकाला १२ धावा करता आल्या. एलिस पेरी आणि रिचा घोष या दोघींनी प्रत्येकी २९-२९ धावांचे सर्वाधिक धावांचे योगदान दिले.

एलिस पेरीला नॅट सीव्हर ब्रंट एलबीडब्ल्यू केले. तिला ३८ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने २९ धावा करता आल्या. त्याचवेळी श्रेयंका पाटील चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. तिलाही नॅट सीवरने बोल्ड केले. मेगन शुटला सायका इशाकने एलबीडब्ल्यू केले. तिला दोन धावा करता आल्या. त्याचवेळी इस्सी वाँगने २० व्या षटकात ऋचा घोष आणि दिशा कासट यांना बाद केले. रिचा १३ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २९धावा करून बाद झाली. दिशाला दोन धावा करता आल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 19:25 IST
Next Story
WTC Final: यावेळीही WTC जिंकण्याचं टीम इंडियाच स्वप्न स्वप्नचं राहणार? ब्रेट लीच्या दाव्याने वाढवली धाकधूक
Exit mobile version