WPL 2023 RCB vs UPW Match Updates: महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये आज १३ वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना डॉ.डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळला जाणार आहेत. या सामन्यात यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. सामन्याला रात्री साडेसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा सामना जिंकून यूपीच्या नजरा प्लेऑफसाठीचा दावा मजबूत करण्यावर आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकून बेंगळुरू प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

आरसीबी पहिल्या विजयाच्या शोधात –

आरसीबीने आतापर्यंत खेळलेले सर्व पाच सामने गमावले आहेत, तर यूपीने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, दोन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. सध्या आरसीबीचे गुणतालिकेत शून्य गुण आहेत. अशा परिस्थितीत बंगळुरूने आजचा सामना गमावला तर त्याचा अंतिम फेरीतील मार्ग कठीण होऊ शकतो.

Indian Premier League Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad sport news
बंगळूरुच्या गोलंदाजांकडे लक्ष!
IPL 2024 Lucknow Super Giants vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: लखनौला ‘यश’ मिळवून देणारा विदर्भवीर ठाकूर आहे तरी कोण?
Sunil Narine's 500th T20 Match
RCB vs KKR : सुनील नरेनने आरसीबीविरुद्ध रचला इतिहास, टी-२०मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील चौथा खेळाडू
Heinrich Klaassen who scored an unbeaten 80 runs against MI
IPL 2024 : हेनरिचला ‘क्लास’ खेळीसाठी सनरायझर्स हैदराबादकडून मिळाले खास ‘गिफ्ट’, PHOTO होतोय व्हायरल

दोन्ही संघांमधील दुसरा सामना –

यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील लीगमधील हा दुसरा सामना आहे, पहिल्या सामन्यात यूपी संघाने शानदार विजय मिळवला होता. मात्र, यूपीलाही शेवटच्या सामन्यात मुंबईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत यूपीलाही आज विजयाच्या ट्रॅकवर परत यायला आवडेल. यूपीने आतापर्यंत ४ पैकी २ सामने जिंकले आहेत. सध्या यूपी पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत अंतिम फेरी गाठण्याच्या त्याच्या आशाही अबाधित आहेत.

हेही वाचा – AFG vs PAK T20: ‘संघाला उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने पहिले पाऊल…’, पीसीबीच्या निर्णयावर पाकिस्तानचा माजी कर्णधार संतापला

सामना हायस्कोरिंग होऊ शकतो –

आजचा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे, येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते.अशा स्थितीत आजचा सामनाही उच्च स्कोअरचा होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे बंगळुरूला आतापर्यंत पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी त्याच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. अशा स्थितीत आज बंगळुरूला ताकद लावावी लागणार आहे.

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): अॅलिसा हिली (कर्णधार), देविका वैद्य, किरण नवगिरे, ग्रेस हॅरिस, ताहलिया मॅकग्रा, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टोन, दीप्ती शर्मा, श्वेता सेहरावत, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, हीदर नाइट, रिचा घोष, श्रेयंका पाटील, दिशा कासट, मेगन शुट, आशा शोबाना, रेणुका ठाकूर सिंग, कनिका आहुजा