scorecardresearch

WPL 2023 : RCB चा दुसरा विजय पण चर्चा तर सोफी डिवाईनचीच! अवघ्या २० चेंडूंमध्ये झळकावलं अर्धशतक

WPL मध्ये आरसीबीचा गुजरातवर विजय, पण चर्चा सोफीच्या झुंजार खेळीचीच

wpl 2023 sophie devine played the biggest innings in the women premier league
८ चौकार आणि ९ षटकारांची मैदानात आतषबाजी

किवी बॅट्समन सोफी डिवाइनने गुजरात जायंट्सच्या विरोधात WPL मध्ये तिचं १६ वं शानदार अर्धशतक झळकावलं. तिच शतक अवघ्या एका रनने हुकलं आहे. जर तिचं शतक झालं असतं तर ही तिचं लीगमधलं हे पहिलं शतक ठरलं असतं. मात्र ९९ धावांची तिने केलेली खेळीही डोळ्याचं पारणं फेडणारी होती.

जाणून घेऊ सोफीच्या खेळीविषयी

सोफीने आजच्या सामन्यात खेळत असतानाच आक्रमक पवित्रा घेतला होता. अवघ्या २० चेंडूंमध्ये तिने तिचं अर्धशतक झळकावलं. त्यानंतरही तिने आक्रमक खेळी करत ९९ धावांची लीगमधली तिची सर्वात मोठी खेळी केली. मात्र ९९ धावांवर तिची विकेट गेल्याने तिचं लीगमधलं पहिलं शतक अवघ्या एका धावेने हुकलं. WPL मध्ये खेळताना ९ चौकार आणि ८ षटकार झळकावत तिने ९९ धावा केल्या. WPL मध्ये २० चेंडूमध्ये सोफीने अर्धशतक झळकावलं. आत्तापर्यंतचं हे तिसरं वेगवान अर्धशतक आहे.

 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात महिला प्रीमियर लीग (WPL) चा १६ वा सामना खेळला गेला. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि आरसीबी संघ आमने-सामने आले होते. आरसीबीने गुजरात जायंट्स ८ गडी राखून मोठा विजय मिळवला. सोफी डिव्हाईनच्या धडाकेबाज खेळीमुळे आरसीबीने सलग दुसरा सामना जिंकला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी बाद १८८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १५.३ षटकांत २ बाद १८९धावा केल्या. सोफी डिव्हाईनने ३६ चेंडूत ९९धावांची स्फोटक खेळी खेळली.

आरसीबी संघाने १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली. सलामी फलंदाज स्मृती आणि सोफीने आक्रमक फलंदाजी करताना पहिल्या विकेट्साठी १२५ धावांची भागादारी केली. त्यानंतर कर्णधार स्मृती मंधाना ३७ धावांवर बाद झाली. तिने आपल्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. तिला स्नेह राणाने बाद केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 23:02 IST